Amravati News: तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, न्यायालयातच केलं विष प्राशन

Amravati Young Man Try To End Life: तरुणाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
Amravati News
Amravati NewsSaam Tv

अमर घटारे, अमरावती

Amravati Police: अमरावतीमध्ये एका तरुणाने न्यायालयातच विष प्राशन (Consumed poison) करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात ही घटना घडली आहे. पोलिसांनी (Amravati Police) तात्काळ या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तरुणाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Amravati News
Jalgaon News: आनंदी घरात अवघ्या क्षणात शोककळा; नाचताना भोवळ आली अन्‌..

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एका तरुणाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. आशिष चरपे असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो चिखली येथे राहणारा आहे. आशिषने सोबत आणणलेले विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर न्यायालय परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

Amravati News
Buldhana News: मृत्यूशी झुंज ठरली अपयशी! खेळता खेळता उकळत्या दुधाच्या कढईत पडली, चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

अमरावतीच्या गाडगे नगर पोलिसांनी तात्काळ प्रसंगावधान राखत या गंभीर अवस्थेत तरुणाला दुचाकीवरुन रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. कौटुंबिक वादातून आशिषने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आशिषने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचं नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com