Viral Video : दोन मगरी त्याच्यावर तुटून पडल्या...; झेब्र्याने शक्कल लढवत मगरींचा पाडला फडशा

झेब्रा थेट एका मगरीचा जबडा त्याच्या तोंडाने चावतो.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडिओ पाहून थक्क व्हायला होतं. मगर हे नाव जरी ऐकल तरी अनेकांना धडकी भरते. अशात जर एक सोडून दोन दोन मगर तुमच्या समोर येऊन उभ्या राहिल्या तर जीव वाचवणं खरचं कठीण आहे. मात्र सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतं आहे जिथे एका झेब्र्याने अशक्य गोष्ट देखील शक्य केली आहे. (Latest Viral Video)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलात नदीमध्ये झेब्रा पाणी पित असतो. एका मगरीची त्यावर नजर जाते. झेब्राला पाहताच ती त्याच्यावर हल्ला करते. आपला जीव वाचवण्यासाठी झेब्रा प्रयत्न करत असतो तितक्यात आणखी एक मगर झेब्राला आपलं भक्ष बनवण्यासाठी तिथे येते. आता तर या झेब्राला त्याचा जीव वाचवणं खूप कठीण झालं होतं. मात्र आपली सर्व शक्ती, ताकत पणाला लावून झेब्रा दोन्ही मगरींना चांगलीच अद्दल घडवतो.

Viral Video
Viral Video : बापरे! हेल्मेटमध्ये चक्क साप...; थरारक व्हिडिओ आला समोर

झेब्रा थेट एका मगरीचा जबडा त्याच्या तोंडाने चावतो. मगर त्याच्यावर हला करत असताना तो तोंडाने तिचा जबडा जोरात चावतो आणि बराच वेळ सोडतंच नाही. तितक्यात दुसरी मगर देखील झेब्रावर हल्ला करते. त्यानंतर हा व्हिडिओ संपतो. पुढे कोण जिंकल आणि कोण हारलं हे अजून समजलेलं नाही. मात्र झेब्राचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून झेब्राचं कौतुक करत आहेत.

Viral Video
Viral News : विवाहित महिलेला प्रपोज करायला गेला अन् फजिती करून बसला; तरुणाला घडली चांगलीच अद्दल, पाहा VIDEO

एवढ्या मोठ्या जंगली आणि हिंस्र प्राण्याला समोर पाहून भल्या भल्या व्यक्ती आपला आर्धा जीव तिथेच सोडून देतात. मात्र हा झेब्रा शेवटपर्यंत मगरीबरोबर दोन हात करताना दिसला. त्याच्या हिंमतीनं युजर्स थक्क झालेत. ranthambore_tours या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आता पर्यंत याला 2 कोटींहून अधिक व्यूव्ज मिळालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com