
Delhi Crime News: दिल्लीच्या फरिदाबाद येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये घरगुतीवादाला कंटाळून एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलांना विहिरीत फेकून दिलं आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. (Delhi Crime News
पत्नीशी झालं होतं भांडण
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भगत असे या नराधमाचे नाव असून तो शॅम कॉलनी परिसरात राहत होता. भगत आणि त्याची पत्नी या दोघांचे भांडण झाले होते. आपल्या आई बाबांचे भांडण आपल्या जीवावर बेतेल याची या दोन चिमुकल्यांना काहीच कल्पना नव्हती. पत्नीसोबत भांडण होऊन राग अनावर झाल्याने नराधम बापाने थेट आपल्या ५ वर्षीय मुलीला आणि ४ वर्षीय मुलीला १५ फूट खोल पाण्यात फेकून दिलं आहे. या विहिरीत जवळपास ५ ते ६ फूट खोल पाणी भरले होते.
शेजारी धावले चिमुकल्यांसाठी
दोन्ही चिमुकल्यांना पाण्यात फेकल्यावर त्यांनी बाहेर येऊनये यासाठी त्या व्यक्तीने स्वत:ही विहीरीत उडी घेतली. अशात शेजारच्या व्यक्तींनी हे दृश्य पाहताच त्यांच्या अंगावर सरकन काटा आला. त्यांनी दोन्ही चिमुकल्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. यावेळी शेजारच्या दोन व्यक्ती पाण्यात उतरल्या. त्यांनी या चिमुकल्यांना बाहेर काढले. बाहेर आल्यावर त्यांनी दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं.
पत्नीसाठी मुलांचा जीव घेतला
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम व्यक्तीच्या पहिल्या पत्नीचे २ वर्षांपूर्वी निधन झाले आहे.त्यामुळे त्याने दुसरं लग्न केलं. मात्र त्याची दुसरी पत्नी त्याला सतत त्रास देत होती. पहिल्या पत्नीच्या दोन मुलांमुळे घरात सतत भांडणे होत होती. त्यामुळे त्याने आपल्या दोन्ही मुलांचा जीव घेतला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.