शारीरिक संबंधाच्या हव्यासापोटी जगातील सर्वात सुंदर बीच नष्ट

प्रवास प्रेमींसाठी युरोप नेहमीच आवडीचा ठरला आहे. परदेशात प्रवास करणारे बहुतेक लोक त्यांच्या सुट्ट्या युरोपमध्ये घालवतात.
शारीरिक संबंधाच्या हव्यासापोटी जगातील सर्वात सुंदर बीच नष्ट
शारीरिक संबंधाच्या हव्यासापोटी जगातील सर्वात सुंदर बीच नष्टSaam TV

प्रवास प्रेमींसाठी युरोप नेहमीच आवडीचा ठरला आहे. परदेशात प्रवास करणारे बहुतेक लोक त्यांच्या सुट्ट्या युरोपमध्ये घालवतात. मात्र आता खूप पर्यटक येत असल्याने येथील सभ्यता, संस्कृती, स्थानिक जीवन आणि ऐतिहासिक स्थळांची प्रचंड हानी होत आहे. एका वृत्तानुसार बाहेरून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक ठिकाणी घाण करुन जातात. इतकंच नाही तर इथल्या सुंदर बीचवरती आणि नैसर्गिक दृश्यांमध्ये ते सेक्सचा देखील प्रचार करत आहेत.

शारीरिक संबंधाच्या हव्यासापोटी जगातील सर्वात सुंदर बीच नष्ट
''परमबीर सिंग अमित शहांच्या आशीर्वादानेच लपून बसले''

एका अभ्यासानुसार, स्पेनचे प्रसिद्ध ग्रॅन कॅनरिया बेट पर्यटकांच्या काही कृत्यांमुळे खराब होत आहे. हे ठिकाण त्याच्या खास निसर्ग राखीव आणि जंगली वाळूच्या ढिगाऱ्यांसाठी ओळखले जाते. येथील वाळूच्या ढिगाऱ्यांना 1982 पासून कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. आफ्रिका आणि युरोपमधील स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे विसाव्याचे ठिकाण आहे, पण आता काही पर्यटकही याचा फायदा घेत आहेत. अभ्यासानुसार, वाळू, सूर्य, समुद्र आणि अनोळखी व्यक्तींसोबत सेक्स, हे पाच S इथल्या पर्यावरणाला हानी पोहोचवत आहेत. संशोधकांना समुद्रकिनाऱ्यावर 298 सेक्स स्पॉट सापडले आहेत. ही ठिकाणं झुडूप आणि ढिगाऱ्यांच्या मध्ये आहेत. या ढिगाऱ्यांचा वापर काही पर्यटक सेक्ससाठी करत आहेत. संशोधकांच्या मते, पर्यटकांच्या या कृतींचा थेट आठ स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींवरही परिणाम होत आहे. संशोधकांच्या मते, पर्यटक या वनस्पती तुडवतात, झाडे आणि वाळू काढून ते सेक्स स्पॉट बनवतात. इतकेच नाही तर पर्यटक या वस्तूंचे कुंपण करून त्यात सिगारेट, कंडोम, टॉयलेट पेपर, वाइप्स, कॅन असा कचरा टाकतात. या ढिगाऱ्यांचा वापर पर्यटक शौचालय म्हणूनही करतात.

संशोधकांना असे आढळून आले की सेक्स स्पॉट जितके दूर असेल तितका त्याचा वापर केला जातो आणि तेवढा जास्त कचरा तिथे होतो. या भागात कचऱ्याच्या पिशव्या आहेत, पण त्या लवकर भरतात. ग्रेन कॅनरियाचा एक महाकाय सरडा, ज्याला पाहण्यासाठी लोक लांबून येत असत, पर्यटकांनी सोडलेला कंडोम खाल्ल्याने मरण पावला. हा बीच समलैंगिकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. विशेषत: अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीतील पर्यटक येथे येतात. अभ्यास लेखकांच्या मते, काही पर्यटक थेट पर्यटन विकासाला हानी पोहोचवत आहेत. अभ्यासाच्या लेखकांचे म्हणणे आहे की आम्ही सार्वजनिक लैंगिक संबंध संपवण्यास सांगत नाही, परंतु त्यामुळे लोकांना होणाऱ्या हानीबद्दल जागरुक व्हावे अशी आमची इच्छा आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com