Adani Group Share News: हिंडेनबर्गनंतर आणखी एका संस्थेचा अदानी ग्रुपवर गंभीर आरोप, शेअर मार्केटमध्ये मोठा फटका

Adani Group Problem Increased: हिंडेनबर्गनंतर (Hindenburg) आता ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (ओसीसीआरपी) दिलेल्या ताज्या अहवालात अदानी समूहावर आरोप केले आहेत.
Adani Group
Adani Group saam tv

Adani Group: गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी ग्रुपच्या (Adani Group) अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अदानी कंपनीवर (Adani Company) एका नवीन अहवालामध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हिंडेनबर्गनंतर (Hindenburg) आता ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (ओसीसीआरपी) दिलेल्या ताज्या अहवालात अदानी समूहावर आरोप केले आहेत. अदानी समूहाने गुपचूप स्वत:चे शेअर्स खरेदी करून शेअर मार्केटमध्ये (Share Market) लाखो डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे या अहवालातून उघड झाले आहे.

Adani Group
Adani-Hindenburg Row: हिंडेनबर्ग प्रकरणी अदानी समूहाला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टच्या समितीने दिली क्लीन चिट

ओसीसीआरपी या ना-नफा माध्यम संस्थेने अदानी ग्रुपसंदर्भातील अहवाल आज प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये त्यांनी अदानी ग्रुपवर स्वत:चे शेअर खरेदी करुन ते शेअर बाजारामध्ये लाखो डॉलर्सने गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओसीसीआरपीकडून करण्यात आलेल्या या आरोपाचा मोठा फटका अदानी ग्रुपला बसला आहे. आज शेअर मार्केट उघडताच अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले.

Adani Group
INDIA Mumbai Meeting : मुंबईतील बैठकीनंतर 'इंडिया'ची दिशा ठरणार? देशाला ५ प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता

ओसीसीआरपीने मॉरिशसमध्ये केलेल्या अदानी ग्रुपच्या व्यवहारांचा तपशील जाहीर करण्याचा दावाही केला आहे. या अहवालानंतर गुरुवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे दिसत आहे. अदानी ग्रुपने २०१३ ते २०१८ या काळात त्यांचे शेअर्स गुपचूप खरेदी केले होते. ओसीसीआरपीचा दावा आहे की त्यांनी मॉरिशस आणि अदानी समूहाच्या अंतर्गत ईमेलद्वारे केलेले व्यवहार पाहिले आहेत.

Adani Group
Ashish Shelar On India Meeting: 'मूर्खाच्या नंदनवनात जगणारी लोकं म्हणजे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस', आशिष शेलारांचं टीकास्त्र

या अहवालात असे म्हटले आहे की, गुंतवणूकदारांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी ग्रुपचे शेअर्स खरेदी आणि विक्री केल्याची किमान दोन प्रकरणे तपासात समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये गुंतवणूकदारांनी विदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी ग्रुपचे शेअर्स खरेदी आणि विकले आहेत.

गुरुवारी ओसीसीआरपी अहवालात नासिर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग या दोन गुंतवणूकदारांची नावे समाविष्ट असल्याचे समोर आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, हे लोकं अदानी कुटुंबाचे दीर्घकाळ व्यवसाय भागीदार आहेत. ओसीसीआरपीने दावा केला आहे की, चांग आणि अहली यांनी गुंतवलेले पैसे अदानी कुटुंबाकडून आल्याचा कोणताही पुरावा नाही. परंतु अहवाल आणि कागदपत्रे स्पष्टपणे दर्शवतात की, अदानी समूहातील त्यांची गुंतवणूक अदानी कुटुंबाच्या समन्वयाने करण्यात आली होती. या प्रकरणामुळे आता अदानी ग्रुपच्या अडचणी वाढल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com