Girl Fight : भररस्त्यात पोरींची जबदस्त फाईट; एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या, पाहा VIDEO

भररस्त्यात तरूणीमध्ये झालेल्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Girls Fight Viral Video
Girls Fight Viral VideoSaam TV

Women Fight Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात, तर काही थक्क करणारे असतात. तुम्ही आजवर मारहाणीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. जर मुलींची मारहाण (Girls Fight) असेल तर तो व्हिडीओ पाहण्यासाठी आणखीनच लोक उत्सुक असतात. मुलींच्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात शेअर देखील होतात. अशाच एका हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Girls Fights Funny Viral Video)

Girls Fight Viral Video
Viral Video: महिलेची नक्कल करत चार पायांवर थिरकली म्हैस; पाहा व्हिडीओ

या व्हिडीओत दोन तरुणी रस्त्यावरून जाताना दिसत आहे. अचानक त्यांच्यात बाचाबाची होते आणि या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत होतं. दोघींमध्ये अशी भांडणं होतात की त्या एकमेकांना जोरदार लाथा-बुक्क्यांनी (Viral Video) मारहाण करतात. इतकंच नाही तर त्या एकमेकांची झिंज्या देखील उपटताना दिसत आहे.

भररस्त्यात तरूणींच्या मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, दोघीही तरुणी एकमेकींचे केस ओढत एकमेकींना जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा या तरुणी रस्त्याच्या मधोमध एकमेकांनी मारहाण करताहेत, त्यावेळी परिसरातील नागरिक मात्र, त्यांचे भांडण सोडण्याऐवजी व्हिडीओ बनवण्यात व्यस्त दिसत आहे. (Women Fights Viral Video)

रस्त्याच्या मधोमध तरुणींमध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीचा हा व्हिडीओ नेमका कोणत्या शहरातला आहे हे अद्यापही समोर आलेलं नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @ViciousVideos या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत या व्हिडीओला 15 हजारांहून अधिक लोकांनी बघितलं आहे. याशिवाय शेकडो लोकांनी लाइक केलं आहे. सोबतच हा व्हिडिओ पाहून लोक जोरदार कमेंट करत आहेत. काही लोकांनी मजेदार मीम्स शेअर करून प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com