Gold Silver Price Down : खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी ! सोन्या-चांदीच्या भावात घसरणं, तपासा आजचे दर

Gold Silver Price in Maharashtra : लग्नसराईत सोन्याच्या भावात तब्बल दीड हजारांनी पुढा वाढ पाहायला मिळाली होती.
Gold Silver Price Down
Gold Silver Price DownSaam Tv

Sona Chandi Bhav : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली आहे.

शुक्रवारी सराफ बाजारात सोन्याच्या भावाने 62 हजारांचा टप्पा पार केला होता. ऐन लग्नसराईत सोन्याच्या भावात तब्बल दीड हजारांनी पुढा वाढ पाहायला मिळाली होती परंतु, आज सोन्याचे दर किंचित कमी झाले आहेत.

Gold Silver Price Down
Gold Silver Price Hike: वीकेंडला सोनं-चांदी महागलं ! १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार अधिक पैसे, तपासा तुमच्या शहरातील दर

गुड रिटर्न्स या  वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,640 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,780 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 77 रूपये आहे. (Gold Silver Price update 8th May 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 62,080 रुपये

दिल्ली - 61,780 रुपये

हैदराबाद - 61,630 रुपये

कोलकत्ता - 61,630 रुपये

लखनऊ - 61,780 रुपये

मुंबई - 61,630 रुपये

पुणे - 61,630 रुपये

नागपूर - 61,630 रुपये

Gold Silver Price Down
How To clean Gold Jewellery : काळवंडलेल्या सोन्याच्या दागिन्यांना पुन्हा नव्यासारखे चमकवायचे आहे ? स्वयंपाकघरातील या 4 पदार्थांचा करा वापर

2. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Gold Silver Price Down
Rupali Bhosale Photo : फोटो काढून माझं बाई मन काही भरत नाही...

3.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com