
Gold Silver Price Today, 17 March 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने-चांदीचे दर उंचावत असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत आहे. देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा व्यवहार 189 रुपयांच्या वाढीसह 58,195 रुपये प्रति तोळा होत आहे, तर चांदीची किंमत प्रती किलो 725 रुपयांच्या वाढीसह 67,256 रुपये झाली आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर
गुडरिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या रिपोर्टनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये सोने-चांदीच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत.
- मुंबई, कोलकाता, हैदराबाद, केरळ, पुणे, विजयवाडा, भुवनेश्वर, कटक, अमरावती, गुंटूर, काकीनाडा, तिरुपती, अनंतपूर, विशाखापट्टणम, निजामाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर भाव 53,560 प्रति 10 ग्रॅम आहे. (Latest Marathi News)
- दिल्ली, जयपूर, लखनऊ, चंदीगड, नोएडा, गाझियाबाद आणि गुडगावमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 53,710 रुपये आहे.
- चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई, सेलम, वेल्लोर, त्रिची आणि तिरुनेलवेली येथे प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 53,250 रुपये आहे.
- भिवंडी, लातूर, वसई-विरार आणि नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 53,590 रुपये आहे. (Gold Silver Price Today)
- पाटणा, सुरत, मंगलोर, दावणगेरे, बेल्लारी आणि म्हैसूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 53,610 रुपये आहे.
सोन्याची चमक आणखी वाढणार?
मार्केटमधील तज्ज्ञांनुसार सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव येत्या काळात 60,500 प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतो. अमेरिका युरोपमधील बँकिंग संकटाचा जागतिक विकास दरावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर मध्यवर्ती बँक दरवाढीचा वेग कमी होऊ शकतो. या सर्व कारणांमुळे सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.