Gujarat Rain News: मूर्ती विसर्जन करताना अनर्थ घडला... नदीत वाहून गेले ५ युवक; तिघांचा मृत्यू

Gujarat News: गुजरात राज्यात पावसामुळे आलेल्या पुरामुळे (Gujarat Flood) या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.
Gujrat Rain News
Gujrat Rain NewsSaamtvnews

Gujarat Rain UPdate: सध्या देशभरात पावसाने हाहाकार माजवल्याचे चित्र दिसत असून देशातील अनेक राज्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात राज्यात पावसामुळे आलेल्या पुरामुळे (Gujarat Flood) या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.

पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याच्याही घटना समोर येत आहेत. गुजरातच्या वडोदरामध्ये अशीच घटना समोर आली असून महिसागर नदीत पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे.

Gujrat Rain News
Telangana Heavy Rainfall: तेलंगणामध्ये पावसाचा कहर, वेगवेगळ्या घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातच्या वडोदरा (Vadodara) शहरात गुरुवारी एक दुर्देवी घटना समोर आली. महिसागर नदीत माता दशामाची मूर्ती विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांपैकी ५ जण नदीत बुडाले. त्यापैकीस दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

पावसाळा असल्याने नदीला पाणी आले असून प्रवाहही वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे, बुडालेली मुले दूरपर्यंत गेली असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या स्थानिकांच्या मदतीसह फायर ब्रिगेडने बुडालेल्या मुलांसाठी शोधमोहिम सुरू केली आहे.

Gujrat Rain News
Thane Rain News : मुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन, नागरिकांच्या धैर्यामुळे माेठा अनर्थ टळला; 50 कुटुंबांचे स्थलांतर (पाहा व्हिडिओ)

सावली तालुक्यातील कनोडा गावात ही दुर्घटना घडली. येथेही दशमा देवीमाताच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ६० ते ७० भाविक आले होते. त्यावेळी, मूर्ती विसर्जनानंतर संजय गोहिल (३२), कौशिक अरविंदभाई गोहिल (२०) आणि विशाल रतिलाल गोहिल (१५) हे नदीत अंघोळीसाठी उतरले होते. पाण्याचा प्रवाह गतीमान असल्याने ते नदीच्या पाण्यात वाहून गेले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com