Independence Day 2023: भारतमाता प्रत्येक भारतीयाचा आवाज... स्वातंत्र्यदिनी राहुल गांधींची खास पोस्ट; भारत जोडो यात्रेचा सांगितला अनुभव

Independence Day India: भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशवासियांना खास संदेश दिला आहे.
Sakal-Saam survey On Rahul Gandhi
Sakal-Saam survey On Rahul GandhiSaam Tv

Independece Day 2023: आज देशभरात भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण देश तिरंग्याच्या तीन रंगात न्हावून निघाला असून सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर यंदा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना एकतेचा संदेश दिला असताना राहुल गांधींनीही स्वातंत्र्यदिनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Sakal-Saam survey On Rahul Gandhi
Samana Editorial: स्वातंत्र्यातील हे 'पारतंत्र्य' उलथवून टाकण्याची शपथ आजच्या स्वातंत्र्य दिनाला साक्षी ठेवून घ्यायला हवी; सामनातून जनतेला आवाहन

राहुल गांधींची पोस्ट...

भूमीला मी माझे घर मानतो, त्या भूमीवरून मी मागील वर्षी १४५ दिवसांची पदयात्रा केली होती. दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यापासून मी सुरुवात केली आणि ऊन, वारा, पाऊस किंवा धूळ या कशाचीही तमा न बाळगता चालत राहिलो. या पदयात्रेच्या निमित्ताने जंगले, पर्वत, खेडी आणि अनेक गावांमधून चालत राहिलो आणि अखेर माझ्या आवडत्या, शीतल आणि बर्फाच्छादित काश्मीरपर्यंत येऊन पोहोचलो.

माझ्या या पदयात्रेदरम्यान अनेकांनी मला विचारले की, ‘‘तुम्ही ही पदयात्रा का करत आहात?’’ इतकेच नव्हे, तर आजदेखील अनेक जण मला विचारतात की, ‘‘तुम्ही पदयात्रा का केली? या पदयात्रेत तुम्ही कशाचा शोध घेत होता? तो शोध पूर्ण झाला का?’’ खरे सांगायचे तर, माझे ज्या गोष्टींवर प्रेम आहे.

ती मला समजावून घ्यायची होती. त्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग करायला देखील तयार होतो, अगदी प्राणपणाला लावायचीही माझी तयारी होती. त्या प्रेमापोटीच गेली अनेक वर्षे मी वेदना सहन केल्या आहेत, अपमान पचवले आहेत. त्यामुळे, मला नेमके काय आवडत आहे, हे मला जाणून घ्यायचे होते. मला जमीन आवडते की डोंगरदऱ्या की समुद्र? हे मला समजून घ्यायचे होते.

Sakal-Saam survey On Rahul Gandhi
Independence Day Wishes: देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मजबूत करण्याचा स्वातंत्र्यदिनी दृढनिर्धार करुया - उपमुख्यमंत्री अजित पवार

माझे प्रेम म्हणजे प्रत्येक भारतीयाचा आवाज आहे; मग तो गरीब असो अथवा श्रीमंत. हा आवाज, ज्यामध्ये आनंद, भीती आणि दुःख हे सर्व सामावले आहे, तो आवाज म्हणजे ‘भारत’ आहे. हा भारताचा आवाज ऐकण्यासाठी, माझ्या सर्व इच्छा-आकांक्षा, माझे ध्येय विसर्जित झाले पाहिजे.

भारत माता ही आपणहून एखाद्याशी बोलेल, पण त्यासाठी ती व्यक्ती नम्र आणि अहंकाररहित असायला हवी. किती सोपे आहे ना हे ! मी एक अशी गोष्ट शोधत होतो जी केवळ विशाल सागरात मिळते, आणि मी मात्र तिचा शोध नदी-नाल्यांत घेत होतो. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com