Operation Ajay: भारताचं 'ऑपरेशन अजय', इस्रायलमधून आणखी 235 भारतीय मायदेशी परतले

Operation Ajay News: शुक्रवारी भारतीयांना घेऊन पहिलं विमान दिल्ली आलं होतं. आता शनिवारी भारतीयांची दुसरी खेप नवी दिल्ली पोहचली आहे.
india Operation Ajay 2nd flight 235 citizens arrives in New Delhi
india Operation Ajay 2nd flight 235 citizens arrives in New Delhi Saam TV

Operation Ajay Latest News

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान, काही भारतीय इस्त्रायलमध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने 'ऑपरेशन अजय' सुरू केलं आहे. या अंतर्गत भारतीयांना मायदेशात परत आणण्याचं काम सुरू आहे. (Latest Marathi News)

india Operation Ajay 2nd flight 235 citizens arrives in New Delhi
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट; क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सुप्रीम कोर्टाचा होकार

शुक्रवारी भारतीयांना घेऊन पहिलं विमान दिल्ली आलं होतं. आता शनिवारी भारतीयांची दुसरी खेप नवी दिल्ली पोहचली आहे. यामध्ये दोन लहान मुलांसह 235 लोकांचा समावेश आहे. इस्रायलमधून भारतात सुखरुप परताच या नागरिकांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय आहेत. या भारतीयांना मायदेशात सुखरुप परत आणण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन अजय' सुरू केलं आहे. आतापर्यंत जवळपास 500 जणांना भारतात परत आणण्यात आलंय. अजूनही अनेक भारतीय मायदेशात परतण्यासाठी उत्सुक आहेत.

भारतात येणार्‍या विमानांमध्ये चढण्यासाठी इस्रायलमधील तेल अवीव विमानतळावर भारतीयांनी गर्दी केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार इस्रायलमधून ज्या लोकांना आणत आहे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाडे घेतले जात नाही.

8 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर, एअर इंडियाने इस्रायलमधून आपली सर्व उड्डाणे तात्काळ बंद केली. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकले. दरम्यान, हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीवर शेकडो क्षेपणास्त्र डागून हजारो इस्रायल नागरिकांचे प्राण घेतले आहेत. तर, त्या प्रत्युत्तरात इस्रायलनेही हल्ले चढवल्याने अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांचाही जीव गेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com