भारत की पाकिस्तान कोण चांगला मित्र? अमेरिकेने दिलं भन्नाट उत्तर

भारत की पाकिस्तान अमेरिकेचा चांगला मित्र कोण आहे? असा प्रश्न अमेरिकेला विचारण्यात आला. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने भन्नाट उत्तर दिलं आहे.
India or Pakistan Who is a better friend
India or Pakistan Who is a better friendSaam TV

नवी दिल्ली : भारत की पाकिस्तान अमेरिकेचा चांगला मित्र कोण आहे? असा प्रश्न अमेरिकेला विचारण्यात आला. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने भन्नाट उत्तर दिलं आहे. भारत हा आमचा जागतिक मित्र आहे. तर पाकिस्तान दक्षिण आशियातील अमेरिकेचा महत्त्वाचा मित्र आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की, भारत हा केवळ आशियातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर अमेरिकेचा महत्त्वाचा मित्र आहे. जागतिक पातळीवर दोन्ही देशांचं महत्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. (Latest Marathi News)

India or Pakistan Who is a better friend
China Fire : चीनमध्ये मोठी दुर्घटना! हेनान प्रांतातील कारखान्याला भीषण आग, ३६ जण होरपळले

वेदांत पटेल पुढे म्हणाले की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि भारताचे (India) परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यातील संबंधही खूप घट्ट आहेत. दुसरीकडे, 'डॉन' या इंग्रजी वृत्तपत्राने अमेरिका-पाकिस्तान संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नावर आणखी एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही देशांमधील संबंध दीर्घ काळापासून प्रस्थापित आहेत, ज्याचे महत्त्व अमेरिकेला समजते.

अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानच्या (Pakistan) अंतर्गत राजकीय अस्थिरतेचा अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंधांवर काहीही परिणाम होत नाही. दोन्ही देशांमधील संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत. याशिवा अमेरिकेने नुकत्याच जारी केलेल्या वक्तव्यांमध्ये स्पष्ट केलं आहे की अमेरिका पाकिस्तानकडे भारत किंवा अफगाणिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहत नाही.

India or Pakistan Who is a better friend
Shraddha Walker Case : घटनेबद्दल आठवणे कठीण झालंय, कोर्टात कबुली देतानाच आफताब काय काय म्हणाला? वाचा

पाकिस्तान हा भारत, चीन, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमारेषा सामायिक करणारा एक महत्त्वाचा देश आहे, असंही अमेरिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, अमेरिका अनेक मुद्द्यांवर पाकिस्तानसोबत एकत्र काम करत आहे. या मुद्द्यांमध्ये ऊर्जा, व्यवसाय, गुंतवणूक, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, हवामान संकट निवारण, अफगाणिस्तानातील स्थिरता आणि दहशतवादाविरुद्धची लढाई यांचा समावेश आहे.

अमेरिकेकडून भारताचं कौतुक

इंडोनेशियामध्ये नुकत्याच झालेल्या G-20 शिखर परिषदेत अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आले. 2023 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारत भूषवेल. G-20 परिषदेपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी कंबोडियात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांनी भारताचं कौतुक देखील केलं आहे.

भारताबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, भारत आणि अमेरिकेची धोरणात्मक भागीदारी दोन्ही देशांच्या सामायिक मूल्यांवर अवलंबून आहे, ज्यामध्ये लोकशाही आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील कायद्यांचे पालन करणे यांचा समावेश आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com