
Bihar : बिहार येथून एक मन विचलित करणारी घटना समोर येत आहे. एका पित्याने आपल्याच मुलीचा अमानुष छळ केला आहे. आपल्या सख्या लहान मुलीला बापाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेत आपल्या पत्नीला देखील गेल्या अनेक दिवसांपासून तो अमानुष वागणूक देत असल्याचे समजले आहे. (Latest Bihar News)
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार येथे बैलही गावात हे कुटुंबीय राहतात. ते फरिदाबाद येथे काही दिवसांपासून आपल्या नातेवाईकाकडे संपूर्ण कुटुंबासह आले आहेत. विशेष म्हणजे अवघ्या 9 वर्षांच्या मुलीला अमानुष वागणूक देणारा हा बाप एक पोलीस इन्स्पेक्टर आहे. मुलीला नीट शिस्त लागावी यासाठी त्याने मुलीला खूप धाकात ठेवलं आहे. मुलीची थोडी जरी चूक झाली तरी तो तिला सिगरेटचा चटका देतो. तसेच पायात बुट घालून तिच्या थोंडवर मरतो. इतकेच नाही तर या नराधम बापाने मुलीला अनेक वेळा विजेचा शॉक देखील दिल्याचं तिने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
बापाच्या या जाचाला कंटाळून मुलीने शनिवारी तेथून पळ काढला. पित्याच्या तावडीतून सुटून तिने थेट पोलिस स्टेशन गाठलं आहे. माझे पापा मला खूप त्रास देतात. मला त्यांच्याबरोबर रहावं वाटत नाही. ते मला मारत असताना मम्मी मला वाचवण्यासाठी आली की, ते तिला देखील खूप मारहाण करतात. असे या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला आपल्या निगराणीवर सखी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलं आहे. सोमवारी मुलगी आणि तिच्या आईचा जबाब नोंदवला जाणार आहे. तसेच पित्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.
बायकोचा हातचं तोडला
मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिला एक अडीच वर्षांची बहीण (Sister) देखील आहे. पोलीस पित्यापासून आपल्या बहिणीला आणि इतरांना वाचवण्यासाठी मदत करावी असे या 9 वर्षांच्या मुलीचे म्हणने आहे. वडिलांनी मारायला सुरुवात केल्यावर मुलीची आई मध्ये पडल्यावर एकदा त्याने आपल्या पत्नीला एवढं मारलं की, तिचा एक हात मोडला. तसेच जेव्हा जेव्हा मुलीची आजी यामध्ये पडत असायची तेव्हा पोलीस पित्याने आजीला देखील मारहाण करण्यास पुढे मागे पाहिले नाही, असं चिमुकलीचं म्हणणं आहे.
पोलीस पित्याने केलेल्या कृत्याची पोलीस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान मुलीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असल्याचे वाटत आहे. कारण तिचा खालचा ओठ फुटला आहे. तसेच अंगावर सिगारेटचे चटके दिसत आहेत. मुलीच्या शरीरावर सर्वत्र जखमा दिसत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.