Israel-Palestine War : युद्धाची भारतीयांना झळ, टीव्ही फ्रिजसह जीवनावश्यक वस्तू महागणार

Israel-Palestine War Affect India : इस्त्रायल- हमास युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते.
Israel-Palestine War
Israel-Palestine WarSaam tv

Daily Product Price Increase :

मागच्या आठवड्याभरापासून इस्त्रायल आणि हमास युद्ध सुरु आहे. याचा परिणाम इतर देशांसह भारतातही दिसून येत आहे. अशातच या युद्धात इराण आणि लेबनॉनसारखे देश ही सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर गहू-तांदूळ आणि इतर खाद्यपदार्थांत वाढ झाली होती. आता इस्त्रायल- हमास युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते. शुक्रवारी ब्रेंट क्रूडमध्येही वाढ झाली.

कच्च्या तेलासोबतच सोन्या-चांदीच्या (Gold Silver) दरातही उसळी पाहायला मिळाली त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा कोलमडणार का अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. कच्च्या तेलावर अवलंबून असलेल्या उत्पादनांच्या किमती (Price) वाढू शकतात.

1. कोणत्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात?

बिझनेस टूडेच्या वृत्तानुसार युद्ध काही दिवस सुरु राहिल्यास इंधनावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी महाग होऊ शकतात. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूमधील स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशिन आणि इतर जीवनावश्यक वस्तूमध्ये वाढ होऊ शकते.

Israel-Palestine War
Oppo Find N3 Flip : ओप्पोचा नवा स्टायलिश फोन लॉन्च; घडी करुन खिशात ठेवता येणार, फीचर्सही भन्नाट

2. सणासुदीत ग्राहकांना दिलासा

सणासुदीच्या (Festival) काळात भारतीय बाजारपेठेत या गोष्टींचा तुडवडा जाणवणार नाही. त्यामुळे किमती काही प्रमाणात स्थिर राहातील. कच्च्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास प्लास्टिक आणि इतर वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात.

3. दैनंदिन वस्तूवरही परिणाम

युद्धाचा परिणाम हा जीवनावश्यक वस्तूंवर दिसेल. FMCG क्षेत्रातील वस्तू महागण्याची शक्यता आहे.

Israel-Palestine War
Most Dangerous Fort In Nashik : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला नाशिकमधील भयावह किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून पर्यटकांना पडते भुरळ!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com