Accident Viral Video: लेन बदलताना भरधाव ट्रकची धडक... व्हॅनमधील चौघांचा मृत्यू; भीषण अपघाताचे CCTV फुटेज

Qazigund Accident Viral Video: काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
 Qazigund Accident Viral Video
Qazigund Accident Viral VideoSaamtv

Jammu Kashmir Accident Video:

जम्मू-काश्मीरमधील काझीगुंड मधून एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव व्हॅनला ट्रकने धडक दिल्याने हा भयंकर अपघात झाला. यामध्ये एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

 Qazigund Accident Viral Video
Nanded Crime News : पाणीपुरी नव्हे ताे निघाला गावठी कट्टा विक्रेता, मध्यप्रदेशाच्या युवकास अटक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत लेव्हडोरा परिसरात व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. लेन बदलताना भरधाव ट्रकने व्हॅनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की गाडीतील सर्वजण हवेत उडाले.

अपघातानंतर सर्वांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच चौघांचा मृत्यू झाला. या संपूर्ण अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज (CCTV Footage) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महामार्गावर भरधाव वेगाने वाहनांची वर्दळ सुरू आहे. अशातच एक व्हॅन लेन बदलण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी आली, याचवेळी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की गाडीमधील सर्वजण बाहेर फेकले गेले, तसेच गाडीही उलटली.

अपघातात गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. गुलाम कादीर भट, मोहम्मद नियाज भट, मुमताज अहमद भट, मुबिना बेगम, आणिमेहविश अख्तर अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी काझीगुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

 Qazigund Accident Viral Video
Amit Shah News: मुंबई दौऱ्याआधी अमित शहांचं मराठीत ट्वीट; म्हणाले, 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी...'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com