Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam Tv

Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ की घट? जाणून घ्या आजचे दर

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Petrol Diesel Price - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या तीन दिवसांपासून स्थिर आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात बरेच बदल झाले आहेत. आज यूपी, राजस्थान आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमती बदलल्या आहेत. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Prices
Raj Thackeray : गौतम अदानी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे आज पेट्रोल 0.16 पैशांनी स्वस्त होऊन 96.60 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 0.16 पैशांनी घसरून 89.77 रुपये प्रति लिटर झाले आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 0.16 पैशांनी महागले असून ते 109.46 रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल 0.15 पैशांनी वाढून 94.61 रुपये प्रति लिटर झाले आहे. गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 0.13 पैशांनी वाढून 96.97 रुपये प्रति लिटर तर डिझेल 0.12 पैशांनी घसरून 89.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Prices
Nashik News : भाजपा कार्यकर्त्याने पत्नीसह संपवली जीवनयात्रा; धक्कादायक कारण समोर, परिसरात खळबळ

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com