Rishabh Pant Health: ऋषभ पंतच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला आहे.
Rishabh Pant Health Updates
Rishabh Pant Health Updatessaam tv

Rishabh Pant Health Updates : टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की कारने तीन-चार उलटून पेट घेतला. या भयंकर घटनेत ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, पंतच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी माहिती दिली. (Latest Marathi News)

Rishabh Pant Health Updates
Pele Passes Away : क्रीडा विश्वावर शोककळा; ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन

ऋषभ पंत कसा तरी गाडीतून बाहेर पडला. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अपघातानंतर ऋषभच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी बरीच माहिती दिली आहे.

अपघातात ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याच्या उजवा पाय फ्रॅक्चर तर पाठीला गंभीर दुखापतही झाली आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यालाही बराच मार लागला आहे. सध्या पंतची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Indian Cricket Team)

Rishabh Pant Health Updates
VIDEO : हिराबेन मोदी अनंतात विलिन; PM मोदींनी दिला मुखाग्नी, गांधीनगरमध्ये शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार

मिळालेल्या माहितीनुसार, पंत हा दिल्लीहून उत्तराखंड येथील आपल्या घरी जात असताना, रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कार तीन ते चार वेळा उलटली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, जखमी अवस्थेत पंत हा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली.

पंतच्या अपघाताची बातमी कळताच, क्रिडाप्रेमींच्या काळाजाचा ठोका चुकला आहे. बांग्लादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत पंतने चांगली कामगिरी केली होती. मात्र, असं असूनही त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात त्याला वगळण्यात आलं आहे. ऋषभ पंत एकदिवसीय किंवा टी-20 मालिकेचा दोन्हीचा भाग नाही. हार्दिक पांड्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे तर रोहित शर्मा वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com