Petrol Diesel Price : जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे एक डॉलरची घट झाली. त्यामुळे आज सलग तिसऱ्या दिवशी कच्चा तेलाचे दर कमी झाले. कच्चा तेलाच्या दरांवरून इंधनाचे (Petrol) भाव ठरत असतात. त्यामुळे कच्चा तेलाचे दर कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केलेत. (Petrol Diesel Price In Mumbai Today)
सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या ताज्या दरांनुसार, आजही देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या 24 तासात ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे एक डॉलरने घसरून प्रति बॅरल $ 89.50 वर आली आहे, तर WTI सुमारे दोन डॉलरने घसरून $82.68 प्रति बॅरलवर आहे. (Petrol Diesel Price News Today)
पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय?
– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
– पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.