Amritpal Singh Arrested: 'पोलिसांनी अमृतपाल सिंगला अटक केलं, त्याने आत्मसमर्पण केलं नाही'; IGPचं मोठं वक्तव्य

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या अटकेवरून पंजाब पोलिसांनी मोठं विधान केलं आहे.
sukhchain singh gill
sukhchain singh gillSaam Tv

Amritpal Singh News Update: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या अटकेवरून पंजाब पोलिसांनी मोठं विधान केलं आहे. आयजीपी सुखचैन सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगला अटक करण्यात आली आहे त्याने आत्मसमर्पण केलेलं नाही.

पोलिसांच्या पथकाने रोडे गावाला चारही बाजूंनी वेढा घातला होता त्यामुळे अमृतपाल सिंग यांच्याकडे काही पर्याय उरला नव्हता. पंजाब पोलिसांनी आज सकाळी 6.45 वाजता त्याला अटक केली. सध्या अमृतपाल सिंग यांना विशेष विमानाने आसामला पाठवण्यात आले आहे. त्याला दिब्रुगड कारागृहात ठेवण्यात येणार आहे.  (Latest Marathi News)

sukhchain singh gill
Gulabrao Patil News: गुलाबराव पाटलांना शोधणाऱ्यास 51 रुपयांचं बक्षीस! गावागावात झळकले पोस्टर; कारण....

त्याचवेळी, ही कारवाई पंजाब (Punjab) पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी संयुक्तपणे केल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली. अमरीपाल सिंग हा 35 दिवसांपासून फरार होते. आयजीपी सुखचैन सिंग गिल म्हणाले की, पंजाबमध्ये कोणतीही अनुचित घटना घडण्याची भीती नाही.

अमृतपाल सिंग विरोधात NSA वॉरंट जारी करण्यात आले होते, त्यानंतर त्याला NSA अंतर्गत अटक करण्यात आली. या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान पंजाबच्या लोकांनी शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखली, सुखचैन सिंग गिल यांनी जनतेचे आभार मानले. (Breaking Marathi News)

sukhchain singh gill
Crime News : 'तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेल', विवाहितेने नकार दिल्यावर केला चाकू हल्ला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आयजीपी गिल यांनी स्पष्ट केले की, पोलिसांनी अमृतपाल सिंगला अटक केली, त्याने आत्मसमर्पण केले नाही. गेल्या 35 दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आज माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com