Tamilnadu 4 Days Duty Bill: आता 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी! विधेयक मंजूर, कामाचे तास मात्र वाढणार

Tamil Nadu News: कर्मचाऱ्यांच्या इच्छेविरुद्ध कामाची सक्ती करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल.
Tamil Nadu 12 hours duty bill approved
Tamil Nadu 12 hours duty bill approvedsaam tv

Tamil Nadu 12 hours duty bill approved: तामिळनाडूच्या विधानसभेत अखेर 12 तास ड्युटी विधेयकाला मंजूरी मिळाली आहे. तामिळनाडू विधानसभेने शुक्रवारी कारखाना (दुरुस्ती) कायदा 2023 मंजूर केला. या कायद्याअंतर्गत राज्यातील कारखान्यांमधील काम करणार्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत लवचिकता स्वीकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे आता अशा कर्मचाऱ्यांचे ड्युटी अवर्स 8 वरून 12 तासांपर्यंत वाढवता येणार आहेत.

या कायद्याला विपोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. या कायद्यामुळे अनिवार्य कामाच्या तासांची संख्या सध्याच्या आठ वरून 12 होईल अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. याला उत्तर देताना तामिळनाडूचे उद्योगमंत्री थंगम थेन्नारसू यांनी ज्या कर्मचाऱ्यांकडे आता आठवड्यातून 4 दिवस काम करण्याचा आणि तीन दिवस सुट्टी घेण्याचा पर्याय आहे त्यांच्यासाठी आठवड्यातील एकूण कामाच्या तासांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Tamil Nadu 12 hours duty bill approved
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी सरकारी बंगला केला रिकामा, चावी लोकसभा सचिवालयाला देणार

सुट्टी, पगार, ओव्हरटाइमच्या नियमांमध्ये बदल नाही

या कायद्याचा महिला कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे. कामगार कल्याण मंत्री सीव्ही गणेशन म्हणाले की "उर्वरित तीन दिवसांच्या रजेचे पैसे दिले जातील आणि रजा, ओव्हरटाईम आणि पगार इत्यादींबाबतच्या सध्याच्या नियमांत कोणताही बदल होणार नाही." त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांच्या इच्छेविरुद्ध कामाची सक्ती करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल. (Tamil Nadu News)

Tamil Nadu 12 hours duty bill approved
Ayodhya Accident : भीषण! जोरदार धडकेनंतर ट्रक उलटून बसवर कोसळला; ७ जणांचा मृत्यू, ४० हून अधिक जखमी

13 राज्यांनी स्विकारला केंद्राचा प्रस्ताव

दरम्यान केंद्र सरकारने नुकतेच सर्व राज्य सरकारांना कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे दिवस आठवड्यातून 4 पर्यंत कमी करण्याबाबत आणि कामाचे तास 8 वरून 12 करण्याचे आवाहन केले होते. अनेक राज्यांनी केंद्र सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 13 राज्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com