Love Affair Crime: प्रेमाचा भयानक अंत! जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराला महिला पोलिसाने संपवलं

Tamil Nadu Crime News: महिला पोलीस कॉन्स्टेबलने नव्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पूर्व प्रियकराची हत्या केली. यानंतर महिला पोलीस आणि तिचा सध्याचा प्रियकर फरार झाले आहेत.
Tamil Nadu Crime News Female Police Constable Love Affair girlfriend killed boyfriend shocking incident
Tamil Nadu Crime News Female Police Constable Love Affair girlfriend killed boyfriend shocking incidentSaam TV

Tamil Nadu Crime News: गेल्या काही दिवसांपासून देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे हे प्रेमप्रकरण, लव्ह अफेयर आणि अनैतिक संबधातून घडत आहेत. पोलीस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन पीडित व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. पण तामिळनाडूमधून पोलिसांच्या वर्दीलाच काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

तामिळनाडू येथील चेंगलपट्टू याठिकाणी वाहतूक पोलीस शाखेत काम करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल मोठा गुन्हा केला आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलने नव्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पूर्व प्रियकराची हत्या केली. यानंतर महिला पोलीस आणि तिचा सध्याचा प्रियकर फरार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

Tamil Nadu Crime News Female Police Constable Love Affair girlfriend killed boyfriend shocking incident
Sangli Crime News: भयंकर! नवऱ्याचा खून करून बायको फरार; पोलीस तपासांत धक्कादायक कारण उघड

मनोहरन (वय २६) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो एक उद्योजक असल्याची माहिती आहे. तर संगीता असं फरार झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलीस तिच्या सध्याच्या प्रियकर अरुण कुमार याचा सुद्धा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडुच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात वाहतूक पोलिस शाखेत संगीता कॉन्स्टेबल कार्यरत आहेत. (Latest Marathi News)

तीन वर्षांपूर्वी संगीता यांच्या पतीने स्वतःचे आयुष्य संपवलं होतं. पतीच्या निधनानंतर संगीता यांची ओळख मनोहरन (२६) नावाच्या व्यक्तीसोबत झाली. संगीता हिने मनोहरन याच्यासोबत असलेले संबंध (Crime News)  संपवले होते. त्यानंतर संगीता आणि परिसरातील अन्य उद्योजक अरुण कुमार यांच्यातील नातं घट्ट झालं होतं.

Tamil Nadu Crime News Female Police Constable Love Affair girlfriend killed boyfriend shocking incident
UP Maid Viral News: आधी बादलीत केली लघुशंका, नंतर त्याच पाण्यानं घर पुसलं; मोलकरणीच्या किळसवाण्या कृत्याचा VIDEO व्हायरल

नातं संपलं असताना देखील मनोहरन कायम संगीता यांचा पाठलाग करायचा. या गोष्टीचा संगीता यांना याचा त्रास होऊ लागला होता. याबद्दल संगीता यांनी अरुण कुमारला सांगितलं होतं. यामुळे अरुण याने संगीताच्या मदतीने मनोहरन याच्या हत्येचा प्लॅन आखला.

दरम्यान, २२ मे रोजी मनोहरन त्याच्या घरी परतत होता. तेव्हाच संगीता यांचा अजितकुमार आणि त्याच्या काही साथीदारांनी मिळून मनोहरन त्याची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. मात्र, पोलिसांनी (Police) तातडीने तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक केली. सध्या संगीता आणि तिचा प्रियकर अरुण कुमार फरार असून पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com