Amit Shah on Manipur: संसदेतील आक्रमक भाषणानंतर अमित शहा अ‍ॅक्शन मोडमध्ये; मणिपूरबाबत घेतला मोठा निर्णय

Amit Shah on Manipur Violence: संसदेतील आक्रमक भाषणानंतर अमित शहा यांनी मणिपूरबाबत एक मोठा निर्णय घेतला.
Amit Shah on Manipur Violence
Amit Shah on Manipur Violencesaam tv

Amit Shah on Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचारांच्या मुद्द्यावरून विरोधक मोदी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले असून लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.

मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली, असा म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Amit Shah on Manipur Violence
Amit Shah News: 'सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली; सुप्रिया सुळेंच्या टीकेला अमित शहांचा पलटवार

मणिपूरमधील हिंसाचारांच्या घटनांचा निषेध करताना त्यावरून सुरू असलेले राजकारण अधिक लाजिरवाणे आहे, असं म्हणत अमित शहा यांनी काँग्रेसवर पलटवार केला. इतकंच नाही तर, काँग्रेस सरकारच्या काळामध्येच मणिपूरमध्ये हिंसाचार रुजल्याचा दावा अमित शहांनी केला.

आताही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना विरोधक तिथे जाऊन आगीत तेल ओतत असल्याचा आरोपही शहा यांनी केला. दरम्यान, संसदेतील आक्रमक भाषणानंतर अमित शहा यांनी मणिपूरबाबत एक मोठा निर्णय घेतला.

Amit Shah on Manipur Violence
Smriti Irani News: राहुल गांधींनी मला फ्लाईंग किस दिला; स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप, भाजप आक्रमक

मणिपूरमधील इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (आयटीएलएफ)च्या एका शिष्टमंडळाने अमित शहा यांची बुधवारी रात्री भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी या शिष्टमंडळाला मणिपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांच्या तैनातीला सक्षम बनवण्याचे आश्वासन दिले. याशिवाय संवेदनशील भागामध्ये कुठल्याही कमतरतेला दूर करण्यासाठी आम्ही तातडीने पाऊले उचलू असं सांगितले.

अमित शहांनी सांगितली मणिपूर हिंसाचाराची कारणं

मणिपूरमध्ये ३ मे रोजी वांशिक हिंसाचाराची ठिगणी पडली. त्यामागील कारणांची माहिती गृहमंत्री शहांनी संसदेत दिली.

– २०२१मध्ये म्यानमारमध्ये लष्करशाही आली. तिथल्या कुकी संघटनेने आंदोलन सुरू केले. त्याविरोधात म्यानमारने कारवाई सुरू केली.

– म्यानमारमधून हजारो कुकी लोकांनी मणिपूर व मिझोराममध्ये आश्रय घेतला. त्यातून स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.

– २००२ मध्ये म्यानमारची सीमा बंद केली गेली व २०२३ मध्ये निर्वासितांना ओळखपत्रे देण्यात आली.

– एप्रिलमध्ये एक निर्वासित वसाहत गाव म्हणून घोषित केल्याची अफवा पसरली. त्यात, उच्च न्यायालयाच्या निकालाने मतैईंना आदिवासी घोषित केले गेले. या निकालामुळे कुकींमध्ये असंतोष आणखी वाढला. त्यातून ३ मे रोजी हिंसा भडकली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com