SSC Exam Result: बोर्डाचा अजब कारभार! दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण; तरीही विद्यार्थीनी झाली फेल

Uttar Pradesh SSC Exam Result: एका विद्यार्थीनीला दहावी परीक्षेत तब्बल ९४ टक्के गुण मिळाले. मात्र, तरीही ती फेल झाल्याचं समोर आलं आहे.
Uttar Pradesh SSC Exam Result
Uttar Pradesh SSC Exam Result Saam TV

Uttar Pradesh SSC Exam Result: देशभरासह राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. आता या परीक्षांचे निकाल कधी लागणार? याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच उत्तरप्रदेश दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल मंगळवारी (२५ एप्रिल) जारी करण्यात आला. या निकालात बोर्डाचा अजब कारभार समोर आला आहे. (Latest Marathi News)

Uttar Pradesh SSC Exam Result
Train Accident: ट्रेन चालवताना महिला मोबाईल बघण्यात दंग; अचानक समोरून दुसरी ट्रेन आली अन्... थरकाप उडवणारा VIDEO

एका विद्यार्थीनीला दहावीत (SSC Exam) तब्बल ९४ टक्के गुण मिळाले. मात्र, तरीही ती फेल झाल्याचं समोर आलं आहे. बोर्ड अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थीनी फेल झाल्याचं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. भावना वर्मा असं या दहावीच्या विद्यार्थीनीचं नाव आहे.

भावना वर्मा या विद्यार्थिनीला ९४ टक्के गुण मिळाले असले तरी ती नापास झाल्याचे सांगण्यात येत आहे. भावनाला लेखी परीक्षेत तब्बल ४०२ मार्क मिळाले. मात्र, तिला प्रॅक्टिकलमध्ये १८० पैकी फक्त १८ गुण देण्यात आले आहेत. त्यामुळेच ती नापास झाल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलंय. (Breaking Marathi News)

भावना ही अभ्यासात हुशार असल्याचं तिच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितलं आहे. तिला आम्ही प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक विषयात ३० पैकी ३० गुण दिले होते. मात्र, बोर्डाच्या चुकीमुळे तिला प्रत्येक विषयात ३ गुण दाखवत आहे. त्यामुळेच ती फेल झाली, असा आरोप शालेय शिक्षकांनी केला आहे.

Uttar Pradesh SSC Exam Result
PM Kisan 14th Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानच्या १४ व्या हप्त्याबाबत आली महत्त्वाची अपडेट

शाळेतील शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, भावनाला आम्ही प्रत्येक विषयात दिलेले ३०-३० गुण जोडले तर तिचे एकूण ६०० पैकी ५६२ गुण होतात. त्यानुसार भावना मोठ्या गुणांसह पास व्हायला हवी होती. मात्र, बोर्डाच्या एका चुकीमुळे ती नापास झाली आहे.

दरम्यान, बोर्डाच्या या निकालानंतर भावनाला मोठा धक्का बसला आहे. ती मानसिक तणावात गेली आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबीय लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहणार असून चौकशीसह न्यायाची मागणी करणार आहे. भावना वर्मा ही अमेठी शहरातील शिव प्रताप इंटर कॉलेजची विद्यार्थिनी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com