Purnesh Modi News: कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्यामुळे राहुल गांधींना झाली २ वर्षांची शिक्षा, गुजरातशी आहे खास कनेक्शन

BJP Mla Purnesh Modi: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मोदी आडनावावरून टीका केल्याप्रकरणी त्यांना सुरतच्या न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
BJP Mla Purnesh Modi vs Congress Rahul Gandhi
BJP Mla Purnesh Modi vs Congress Rahul GandhiSaam TV

Rahul Gandhi News: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मोदी आडनावावरून टीका केल्याप्रकरणी त्यांना सुरतच्या न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. (Latest Marathi News)

भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवलं असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.या विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाने ३० दिवसांची शिक्षाही स्थगित केली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

BJP Mla Purnesh Modi vs Congress Rahul Gandhi
Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांत तक्रार; प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप

दरम्यान, राहुल गांधी यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर मोदी हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात कोर्टात (Court) मानहानीचा खटला दाखल करणारे पूर्णेश मोदी आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. जाणून घेऊयात कोण आहेत पूर्णेश मोदी...

कोण आहेत पूर्णेश मोदी?

पूर्णेश मोदी हे भाजपचे (BJP) आमदार आहेत. ते सुरतमधील अडाजन भागात आपल्या कुटुंबासहित राहतात. गुजरातच्या तेराव्या विधानसभेची (2013-17) पोटनिवडणूक जिंकून ते प्रथमच सभागृहात इन्ट्री मारली. खरे तर 2013 साली तत्कालीन आमदार किशोर भाई यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यानंतर पोटनिवडणूक झाली तेव्हा भाजपने पूर्णेश मोदींना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले.

BJP Mla Purnesh Modi vs Congress Rahul Gandhi
Breaking News : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची मोठी कारवाई; माहीमच्या समुद्रातील अनाधिकृत बांधकाम हटवलं

त्यानंतर 2017 च्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा पूर्णेश मोदी यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी पुन्हा आपल्या मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवलं. त्यांना 1 लाख 11 हजार 615 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार इक्बाल दाऊद पटेल यांना केवळ 33 हजार 733 मते मिळाली होती. पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मुळात सुरतमधील लोकांचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो.

गुजरातशी आहे खास कनेक्शन

पूर्णेश मोदी यांनी 12 ऑगस्ट 2016 ते 25 डिसेंबर 2017 या कालावधीत गुजरात सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीचे सदस्य म्हणून संसदीय सचिवाची भूमिका पार पाडली होती. याआधी ते सुरत महापालिकेचे नगरसेवक होते. 2000-05 मध्ये ते महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते होते. याशिवाय ते 2009-12 आणि 2013-16 मध्ये सुरत नगर भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत.

BJP Mla Purnesh Modi vs Congress Rahul Gandhi
Rahul Gandhi यांना 2 वर्षांची शिक्षा

'राहुल गांधींच्या विधानावरून आक्रमक'

२०१९ मध्ये कर्नाटच्या कोलार येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. याविरोधात पूर्णेश मोदी यांनी कोर्टात धाव घेतली. तसंच मानहानीचा खटला देखील दाखल केला. राहुल यांचे हे विधान संपूर्ण मोदी आडनाव असलेल्या समाजाचा अपमान आहे, असं म्हणत आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता.

Edited By- Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com