
Women's Relationships: जगात अनेक प्रकारच्या जमाती राहतात. या जमातीचे लोक जगाच्या नजरेपासून दूर राहणे पसंत करतात. जिथे सामान्य माणसाची काळाबरोबर प्रगती होते, तिथे आजही हे लोक आपल्या जुन्या परंपरांचे पालन करत आहेत. हे ऐकून तुम्हाला वाटत असेल, की या जमातींच्या लोकांच्या चालीरीती फार जुन्या असतील. पण तसं मुळात नाही. आजही जगात अशा काही जमाती अस्तित्वात आहेत, ज्यांच्या परंपरा आजच्या आधुनिक समाजाला फेल करतात.
आजच्या काळात अनेकजण लिव्ह इन मध्ये राहणं पसंत करतात. या गोष्टीला अनेकांकडून विरोध होतो. मात्र, तरी देखील काही जोडपी शहरांमध्ये घराबाहेर गुप्तपणे लिव्ह-इनमध्ये राहतात. भारतात लग्न हा सोबत राहण्याचा सगळ्यात मोठा क्रायटेरिया आहे. त्यामुळे लिव्ह-इनला अंगिकारण्यात लोकांना वेळ लागतो.
पण चीनमध्ये एक असा समाज आहे, जो आजपासून नाही तर, हजारो वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत आहे. या समाजातील महिलांना पुरूषांमध्ये अजिबात रस नाही. शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा झाली तर, त्या आवडेल त्या पुरूषाला वाटेल तेव्हा घरी बोलावतात आणि संबंध ठेवून गरोदर राहतात. एकदा का आपण गरोदर असल्याची त्यांना खात्री पटली की, त्या पुरूषांना घरातून हाकलून देतात.
दक्षिण-पश्चिम चीनमधील मोसुआ जमातीमध्ये अनेक वर्षांपासून लिव्ह इनची परंपरा सुरू आहे. या जमातीतील महिलांना लग्नात रस नाही. इथे ना पुरुष लग्न करतात ना मुलाच्या संगोपनात मदत करतात. लग्न या शब्दाला या जमातीत स्थान नाही. या परंपरेला वॉकिंग मॅरेज म्हणतात.
यामध्ये स्त्री-पुरुष एकत्र राहत नाही, मात्र तरी देखील शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा झाल्यावर त्या पुरूषांना घरी बोलावून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करतात. यानंतर महिला गरोदर राहिली, की तिला पुरूषाची गरज भासत नाही. पुढे या महिला एकटं राहून आपल्या बाळाचं संगोपन करतात.
आजकाल लिव्ह-इन रिलेशनशिप ही कॉन्सेप्ट फार चलनात आहे. बरेच लोक या विरोधात आवाजही उठवतात. तरीही बरेच कपल लिव्ह-इनमध्ये राहतात. भारतात लग्न हा सोबत राहण्याचा सगळ्यात मोठा क्रायटेरिया आहे. त्यामुळे लिव्ह-इनला अंगिकारण्यात लोकांना वेळ लागतो. पण शहरात हे जास्त होतं.
मोसुआ जमातीची कुटुंबे अतिशय स्वतंत्र विचारांची आहेत. मुलीची पाळी सुरू होताच तिला स्वतंत्र खोली दिली जाते. यानंतर ती रात्री तिच्या खोलीत कोणालाही बोलवू शकते. पुरूषासोबत ठेवलेल्या संबंधातून मूल जन्माला आले, तर त्याची काळजी या मुलीलाच घ्यावी लागते.
बाळाच्या संगोपणात वडील कोणत्याही प्रकारे मदत करत नाहीत. मात्र, या समाजातील मुलांना आपल्या वडिलांची माहिती नाही, असे नाही. कोणत्याही विशेष सणाला वडिलांनाही मुलाला भेटायला बोलावले जाते. अशा प्रकारे प्रत्येकाला मुलाचे वडील कोण आहेत हे कळते.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.