
Viral News : कोणताही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगली शिकवण देतो, त्याला चांगल्या वाईटाची समज देतो, आयुष्यातील योग्य मार्ग दाखवतो. म्हणूनच आई-वडील आपल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शाळेत शिकण्यासाठी पाठवतात. मात्र, एका महिला शिक्षिकेने असं काही केलं, की ज्यामुळे १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी आपल्या आयुष्यातील योग्य मार्गच विसरला आहे. चांगले वाईट यामधील फरक विसरला आहे. (Latest Marathi News)
उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोयडा शहरातील एक महिला शिक्षिका (Teacher) एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन पळून गेली आहे. आता मुलाच्या वडिलांनी या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली आहे. सध्या दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच दोघेही सापडतील असं पोलिसांनी सांगितलं आहे.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, शिक्षिका आपल्यापेक्षा ६ वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती त्याला घेऊन पळून गेली. मुलगा वेळेवर घरी न पोहचल्याने कुटुंबीय काळजीत पडले. कुटुंबीयांनी मुलाचा खूप शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही.
महिला शिक्षिकेच्या पतीने या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली. आता पोलीस (Police) शिक्षका आणि विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलगा सहा महिन्यांपूर्वी या महिला शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होता. इथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्यूशन शिकवणाऱ्या शिक्षिकेचे वय २२ वर्षे असून मुलाचे वय १६ वर्ष आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर ११३ मध्ये राहणारी २२ वर्षीय शिक्षिका तिच्या घरात मुलांना ट्युशन शिकवायची. या शिक्षिकेकडे तिच्या वस्तीतील एक १६ वर्षांचा मुलगाही शिकायला जायचा. सुमारे ६ महिन्यांपूर्वी हा मुलगा शिक्षिकेकडे शिकण्यासाठी आला होता. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते एकमेकांना आवडू लागले. रविवारी दोघेही घरातून पळून गेल्याचा आरोप आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीत (Crime News) मुलाच्या वडिलांनी सांगितले की, आपला मुलगा मावशीच्या घरी जात असल्याचे सांगून निघून गेला होता, पण परत आला नाही. तर शिक्षिकेच्या पतीचे म्हणणे आहे की, तिचे दोन्ही नंबर बंद आहेत. या शिक्षिकेने आपल्या मुलाला फूस लावून पळून नेल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विद्यार्थी आणि महिला शिक्षकेचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.