
Viral Video: आजच्या तरुणांना बाईक राईडचे (Bike Riding) प्रचंड वेड असल्याचे पाहायला मिळते. रस्त्यावर वेगाने बाईक चालवातानाचे, बाईक स्टंट करतानाचे तरुणांचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील. पण कधी नदीमध्ये बाईक चालवतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का?. याचे उत्तर कदाचित नाही असेच असेल. नुकताच सोशल मीडियावर नदीमध्ये बाईक चालवतानाचा तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातला असून हा चर्चेचा विषय ठरला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये भली मोठी नदी दिसत आहे. या नदीमध्ये एक तरुण चक्क सुसाट बाईक चालवताना दिसत आहे. नदीवर वाहनांना जाण्यासाठी पूल असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण हा तरुण या पुलाचा वापर न करता थेट नदीमध्येच बाईक टाकतो आणि सुसाट चालवतो. अन् पाहता पाहता हा तरुण नदीमध्ये बाईक चालवत या टोकावरुन दुसऱ्या टोकावर पोहचोसुद्धा.
नदीच्या पाण्याचा वेग पाहता हा तरुण बाईकसोबत वाहून जाईल अशी भीती व्हिडिओ पाहताना वाटते. पण या तरुणाचा कॉन्फिडन्स खूपच जबरदस्त आहे. त्याने कसलीही भीती न बाळगता थेट नदीत सुसाट बाईक चालवत दुसऱ्या टोकाला घेऊन गेला. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळाली नाही. पण हा व्हिडिओ पाहताना कोणाच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
MotorOctane नावाच्या ट्विटरवर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. महत्वाचे म्हणजे 3 हजारांपेक्षा अधिक जणांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'इंजिनमध्ये पाणी गेले असते तर काय झाले असते?' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'आसाममध्ये हे खूपच सामान्य आहे. याठिकाणी स्थानिक लोकांना नदी माहिती आहे. ते लहानपणापासून तिथेच राहतात.'
Edited By - Priya Vijay More
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.