महिलेच्या मृत्यूस कारण ठरलेल्या दोन मोबाईल चोरट्यांना नौपाडा पोलिसांकडून अटक

विकास काटे
शुक्रवार, 11 जून 2021

रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा चोरट्याने मोबाईल हिसकवताना झालेल्या झटापटीत तन्वी राससिंग या महिलेचा रिक्षातून पडून मृत्यू झाला होता. सदरची घटना तीन हात नाका परिसर, ठाणे येथे घडली होती. 

ठाणे : रिक्षातून Rickshaw प्रवास करणाऱ्या महिलेचा Woman चोरट्याने मोबाईल Mobile  हिसकवताना झालेल्या झटापटीत महिलेचा रिक्षातून पडून मृत्यू Death झाला होता. सदरची घटना तीन हात नाका येथे घडली होती. Naupada police arrest two mobile thieves for causing woman's death

पहा व्हिडीओ -

दिनांक ९ जून रोजी साधारणतः रात्री ८ च्या सुमारास मायोस स्पा या ठिकाणी काम करणाऱ्या महिला मुंबईच्या दिशेने रिक्षाने येत असताना डाव्या बाजूने पल्सर गाडीवरून येणाऱ्या दोन चोरट्यांनी सदर महिलेच्या हातातील मोबाईल हिसकवला Snatch होता. 

मोबाईल हिसकवताना रिक्षातून तोल जाऊन रस्त्यावर पडलेल्या तन्वी राससिंग या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत सदर महिलेला शेजारीच कळवा Kalwa येथे असलेल्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. 

या संपूर्ण घटनेच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत अखेर नौपाडा पोलिसांनी Police या चोरट्यांना Thieves बेड्या ठोकल्या असून त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि कलम १७७/२१, ३०४,३९२,३४ अंतर्गत नौपाडा पोलीस ठाण्यात Thane गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरात अपहरण करुन मुलाची हत्या; खंडणी स्वरुपात मागितलं होतं काकाचं शिर

सदर गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी ४ तुकड्या तयार केल्या होत्या. चोवीस तासाच्या आत या गंभीर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. अलकेश उर्फ परवेझ मोमीन अन्सारी व सोहेल रमझान अन्सारी दोघेही राहणार भिवंडी Bhiwandi अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live