....मी उपरोधात्मक बोललो - जयंत पाटलांनी केली सारवासारव

भारत नागणे
रविवार, 4 एप्रिल 2021

कोरोना आहे हे लोकांना समजावे म्हणून मी उपरोधात्मक वक्तव्य केले होते. अशी सारवासारव  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना केली आहे. जगात कोरोना नाही असे वक्तव्य त्यांनी आज केले होते

पंढरपूर - आजच्या प्रचार सभेला झालेल्या गर्दीमुळे कोरोना (Corona) वाढण्याचा धोका होता. सभेत कोणाच्या ही तोंडाला मास्क नव्हता. कोरोना आहे हे लोकांना समजावे म्हणून मी उपरोधात्मक वक्तव्य केले होते, अशी सारवासारव जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकाराशी बोलताना केली. आहे. NCP State President Jayant Patil Clarifies his statement about Corona

पंढरपूर (Pandharpur) विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आज जलसंपदा मंत्री आणि पालक मंत्री दत्तात्रय (Dattatraya Bharne) भरणे यांच्या उपस्थितीत राझंणी येथे प्रचार सभा झाली. सभेला शेकडो लोकांची गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सींगचा या सभेत पूर्णतः फज्जा उडाला होता.

आधीचे वृत्त - म्हणून मी मास्क काढला

दरम्यान  या सभेत बोलताना  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तुमच्या चेहेऱ्याकडे पाहून जगात कोरोना नाही, असे वाटते त्यामुळे मीही मास्क काढून ठेवला आहे असे वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सभा संपल्यानंतर आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी आपण सभेत बोलताना लोकांना उपरोधात्मक बोललो होतो असे सांगून त्यांनी आपल्या वक्तव्याची सारवासारव केली आहे. 

Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live