‘व्हिटॅमिन सी’ चे सेवन रोज करता ? पण अति तेथे मातीही होऊ शकते

Overdose of Vitamin C can be bad for your health
Overdose of Vitamin C can be bad for your health

मुंबई : कोरोना Corona काळात प्रत्येक जण रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेषतः व्हिटॅमिन सी Vitamin C आणि झिंकच्या Zinc गोळ्या, च्यवनप्राश, काढा इत्यादींचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे सांगितले जाते. यातही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी वर लोकांचा जास्त विश्वास आहे. कारण व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करते. असा दावा आहे. परंतु यात, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, व्हिटॅमिन सी चा जर जास्त वापर झाला तर तो आरोग्यासाठी हानिकारकहि ठरू शकतो. अशा परिस्थितीत एखाद्याचे आरोग्य सुधारण्याऐवजी त्यात आणखी बिघाड होऊ शकतो. Overdose of Vitamin C can be bad for your health

किती आवश्यक आहे व्हिटॅमिन सी 
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही व्यक्तीसाठी दररोज 65 ते 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सी घेणे पुरेसे असते. परंतु जर आपण व्हिटॅमिन सी 1000 मिलीग्रामपेक्षा जास्त घेतले तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. सामान्यत: स्त्रियांनी 75 मिलीग्राम, पुरुषांसाठी 90 मिलीग्राम. गर्भवती महिलांसाठी 85 मिलीग्राम घ्यावे आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी 120 मिलीग्रामपर्यंत व्हिटॅमिन सी सेवन करावे गरजेचे आहे.

हे देखील पहा -

या समस्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने उद्भवू शकतात
कोणत्याही गोष्टीचा अभाव अधिक प्रमाण हानिकारक ठरू शकतो. व्हिटॅमिन सी च्या अति वापरामुळे अतिसार, पोटदुखी, छातीत जळजळ, मळमळ, उलट्या, डोकेदुखी आणि निद्रानाश अशा अनेक समस्या तुम्हाला उद्भवू शकतात.

व्हिटॅमिन सी का आहे आवश्यक
व्हिटॅमिन सी एक अँटिऑक्सिडेंट Antioxidents आहे जे कनेक्टिव टिश्यूजला चांगले बनवते आणि सांध्याला सपोर्ट देण्याचे कार्य करते. हे कोलेजन, एल-कॅरनिटिन आणि शरीरातील काही न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यास उपयुक्त असल्याचे सांगिलते जाते. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन सी तीव्र श्वसन संक्रमण रोखण्यात आणि टीबीवरील उपचारांमध्ये उपयुक्त आहे. 

या पदार्थांमधून मिळते व्हिटॅमिन सी
संत्रा, लाल शिमला मिरची, केळी,अननस, आंबा, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, पालक, पपई आणि लिंबू इत्यादींमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.

Edited By- Sanika Gade
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com