पॅरोल वर्ती तुरुंगातून बाहेर आलेल्या गुन्हेगारावर पोलिसांची कारवाई.. 

भूषण अहिरे 
मंगळवार, 8 जून 2021

मालेगाव रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला धुळे तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

धुळे : मालेगाव Malegaon रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला धुळे Dhule तालुका पोलिसांनी Police मुसक्या आवळल्या आहेत. धुळ्याहून मालेगाव च्या दिशेने रात्रीच्या वेळी जाणाऱ्या- येणाऱ्या धुळेकर, त्याला रस्त्यात अडवून दोन भामट्यांनी मारहाण केली. Police action against thieves in Dhule    

त्याकडे खिशात असलेले पैसे, मोबाईल Mobile व इतर अजून महागड्या वस्तू हिसकावून घेतल्या, नंतर लुट झालेल्या इसमाने तात्काळ धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी मुंबई Mumbai- आग्रा Agra महामार्गावरील धुळे मालेगाव आर्वी ते झोडगे या परिसरामध्ये छुप्या पद्धतीने पेट्रोलिंग Patrolling केली असता.

बंगाल : वीज कोसळून २६ लोकांचा मृत्यू..  

या पेट्रोलिंग दरम्यान धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत पासून हाकेच्या अंतरावर मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन भामटे आणखी दुसऱ्या प्रवाश्याला लुटत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून The scene एका भामट्याला ताब्यात घेतले आहे. दुसर्‍याने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पोबारा केला आहे. Police action against thieves in Dhule

हे देखील पहा  

संबंधित आरोपी Accused हे सराईत गुन्हेगार असल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. दोघेही चोरटे आणखी दुसऱ्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असून, त्यांना पॅरोल वरती काही दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर आल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. धुळे तालुका पोलिसांनी तात्काळ मालेगाव तालुका पोलिसांना याबाबतची माहिती देत या चोरट्यांना त्यांच्या हवाली केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live