पंचनाम्याचे अहवाल केंद्राकडे करणार सादर; अशोक परमार.. 

Punchnama report will be submitted to the Center
Punchnama report will be submitted to the Center

सिंधुदुर्ग : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्ह्यात केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले होते. केंद्रीय समितीने Central Committee मालवणला Malvan भेट दिली. किनारपट्टी भागातून भेटी देऊन या समितीने नुकसानीची पाहणी केली आहे. जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल केंद्राकडे सादर करणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक परमार यांनी दिली आहे. Punchnama report will be submitted to the Center 

तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती जिल्ह्यात दाखल झाली. या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी आचरा Achara, मालवण, चिवला बीच Chiwla Beach, वायरी, तारकर्ली, देवबाग या नुकसानग्रस्त भागांना भेट दिली आहे. या समितीमध्ये अर्थविभागाचे प्रमुख अभय कुमार, केंद्रीय कृषी खात्याचे सिंग, ऊर्जा विभागाचे प्रमुख जे.के. राठोड, केंद्रीय मत्स्य विभागाचे प्रमुख अशोक कदम यांची हजेरी होती. 

यावेळी प्रांताधिकारी तुषार मठकर, मालवण-कुडाळचे Kundal प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे आदी उपस्थित होते. मालवण येथे चिवला किनाऱ्याची पाहणी करून समिती सदस्यांनी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व वीज वितरणच्या अभियंता  गिरकर यांच्याशी चर्चा केली असता, केवळ वादळामुळे नुकसानी झाल्यावरच वीज पोल Power pole न बदलता खबरदारी म्हणून खराब झालेले पोलही इतर कालावधीत बदलून घेण्याची सूचना समिती सदस्यांनी केली आहे. Punchnama report will be submitted to the Center 

हे देखील पहा 

नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी मालवण हे समुद्र किनारी वसलेले असल्याने वीज खांबांना  गंज लागून, ते खराब होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते वादळामुळे मोठी हानी झाली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे शासकीय यंत्रणेने योग्य ते पंचनामे केले आहेत का? याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय समितीचा दौरा असून याचा योग्य तो अहवाल केंद्राकडे सादर करण्याचे समिती अध्यक्ष अशोक परमार यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com