ट्विटर आणि केंद्र सरकारच्या ब्ल्युटिक' च्या वादात राहुल गांधींची उडी  

rahul gandhi 1.jpg
rahul gandhi 1.jpg

वृत्तसंस्था : देशात कोविड 19 Covid 19  महामारीच्या काळात लसीचा तुटवडा Lack of vaccine  असताना  केंद्र सरकार ब्ल्यु टिक Blue Tik  साठी लढत आहे, आता तुम्हाला कोविड प्रतिबंधक लस हवी असेल तर तुम्हाला आत्मनिर्भर व्हायला हवं,'' अशा शब्दात कॉंग्रेस खासदार राहुल गांधी Rahul gandhi  यांनी ट्विट करत  केंद्र सरकारवर Central Govenrnment  निशाणा साधला आहे.  यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसत आहे.  नव्या आयटी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात सुरू असलेल्या वादात आता  राहुल गांधीं उडी घेतली आहे.  (Rahul Gandhi's criticism on Twitter and the central government's Blue Tick issue)

ट्विटरने काल माजी राष्ट्रपती व्यंकय्या  नायडू  यांच्या पाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटमधून ब्ल्यु टिक हटवले.  मात्र केंद्र सरकारने याची दखल घेत विरोध केल्यानंतर ट्विटरने पुन्हा त्यांना अधिकृत अकाऊंटच्या नावसमोर ब्ल्यु टिक लागू केले.   ट्विटरच्या नियमानुसार, जर सह महिन्यापेक्षा अधिक काळ तुम्ही आपल्या अकाऊंटवरुन काही पोस्ट केले नसेल तर ट्विटर ते अकाऊंट निष्क्रिय असल्याचे समजून व्हेरिफाय टिक काढून टाकेल.  आरएसएस च्या  या नेत्यांनी गेल्या काही महिन्यांपासून काहीच पोस्ट केले नव्हते, त्यामुळे त्यांचे अकाऊंट फेक असल्याचे समजून त्यावरील ब्ल्यु टिक काढून टाकण्यात आली. यात विशेष बाब म्हणजे  ट्विटरचे ही नियम अशावेळी समोर आले आहेत ज्यावेळी केंद्राच्या  नव्या नियमामुळे केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये वाद सुरू आहेत. 

यात भर म्हणून आता राहुल गांधी यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे.  भारत सरकारच्या नव्या आयटी कायद्याबाबत ट्विटर आणि सरकार समोरासमोर आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या  नवीन मार्गदर्शक नियमांचे ट्विटरने अद्याप पालन केले नाही. काल सरकारने ट्विटरला अखेरची नोटीस पाठविली असून नियमांचे पालन न केल्यास सरकार कठोर निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com