सोलापुरात रेल्वेचे आयसोलेशन कोच पडलेत धुळ खात... (पहा व्हिडीओ)

Railway Isolation Coach
Railway Isolation Coach

सोलापूर: एकीकडे राज्यामध्ये रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरु आहे. तर दुसरीकडे सोलापूर Solapur मध्ये रेल्वेने Railway पाठवलेले आयसोलेशन कोच Isolation coach हे धूळखात पडले आहेत. रेल्वेचे आयसोलेशन कोच तब्बल महिनाभरापासून धूळखात पडलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा चांगलाच फटका बसत आहे.Railway Isolation coaches lying unused in Solapur

सोलापूर रेल्वे स्थानकावर Railway Sation रेल्वेचे आयसोलेशन कोच येऊन तब्बल एक महिना झाला आहे. मात्र जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या Municipal Corporation हलगर्जीपणामुळे हे कोच महिना उलटून गेला तरीही त्याचा वापर होताना दिसून येत नाही.

कोच येऊन महिना संपत आला तरी त्याच्या वापराबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या कोच मधून रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी कोण पुरवणार याबाबत निर्णय न झाल्याने आयसोलेशन कोचचा वापर होत नाही. 

एक आयसोलेशन कोच रेल्वे मध्ये एकूण संख्या आहे २२. प्रत्येक कोच मधली बेड संख्या आहे १४. रेल्वेतील एकूण आयसोलेशन कोच बेड संख्या आहे ३०८. सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरती हे कोच महिन्याभरापासून उभे आहेत.

मागील वर्षी सुद्धा या आयसोलेशन कोचचा वापर झालेला नव्हता. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर Health Department प्रचंड ताण तर येत आहे, त्यात अशाप्रकारे हलगर्जीपणा म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल.  Railway Isolation coaches lying unused in Solapur

रुग्णालयात बेड Hospital Beds सुद्धा अपुरे पडत असल्याकारणाने सोलापूर जिल्हा प्रशासनाने रेल्वेमध्ये आयसोलेशन सेंटर तयार केले गेले होते. त्या संबंधी अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केली होती. मात्र सोलापूर जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून याला ग्रीन सिग्नल न मिळाल्याने हे सेंटर अद्याप धूळ खात पडून असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com