राज्य सरकारचं भविष्य ते चालवणाऱ्यांनाही माहित नाही; दानवेंची खरमरीत टीका

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

राज्य सरकारचं भविष्य सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांसह सरकारचं नेतृत्व करणाऱ्यालाही माहित नसून, ते रोज दिवस मोजत आहेत

जालना : राज्य सरकारचं भविष्य सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांसह सरकारचं नेतृत्व करणाऱ्यालाही माहित नसून, ते रोज दिवस मोजत आहेत. सरकार किती वर्षे चालेल हा प्रश्नच नसून सरकारमधील लोक आता रोज अखेरच्या घटका मोजत असल्याचा, हल्लाबोल दानवे यांनी राज्य सरकारवर केला आहे. (Raosaheb Danve criticizes the state government)  सीआरपीएफच्या (CRPF) मुंबई मुख्यालयाला धमकीचा मेल आला असून देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या जीविताला धोका असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भांत विचारलं असता असे प्रकार नेहमीच आधीही झाल्याचे सांगून केंद्र सरकार याची खबरदारी घेईल, असं सांगून दानवे यांनी या प्रकाराचा निषेध नोंदविला आहे.

हेही वाचा - १० वी १२वी च्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी बोलून निर्णय - वर्षा गायकवाड

देशात कोरोना (Corona) रोखण्यात आपण यशस्वी झालो. मात्र, महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात यश मिळालं नाही. देशातील अर्धे ऍक्टीव्ह रुग्ण एकट्या महाराष्ट्रात असून वेळीच राज्य सरकारने व्यवस्था उभी न केल्यानं ही परिस्थिती ओढावली असल्याचा, हल्लाबोल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर केला आहे. बेड्स, ऑक्सिजन (Oxygen) या सुविधा सरकारने तातडीने उपलब्ध करून द्यायला हव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. १०० कोटींच्या हप्त्याप्रकरणी कोर्टाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीत मागणारा मागत होता, की कुणी मागायला लावले हे सिद्ध होईल. मात्र एकट्या अधिकाऱ्यांची एवढे पैसे मागण्याची हिंमत नाही, त्याला कुणीतरी मागायला लावले असावे, असं मतही दानवे यांनी व्यक्त केलं आहे.

Edited By - Digambar Jadhav. 


संबंधित बातम्या

Saam TV Live