भगवान परशुराम जयंतीदिनी ५ लाख महामृत्युंजय जपाचे पठण; परदेशातूनही प्रतिसाद

विश्वभुषण लिमये
शुक्रवार, 14 मे 2021

भगवान परशुराम महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहर व जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घराघरात बसून ५ लाख महामृत्युंजय मंत्र जप करण्यात आला. कोरोनाच्या महामारीतून देशातील तसेच पृथ्वीतलावरील सर्वांचेच रक्षण व्हावे आणि ही महामारी लवकरात लवकर संपावी यासाठी या महामृत्यूंजय मंत्र जपाचे आयोजन करण्यात आले होते. 

सोलापूर : भगवान परशुराम Bhagvan Parshuram महाराज जयंतीनिमित्त Jayanti सोलापूर Solapur शहर व जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घराघरात बसून ५ लाख महामृत्युंजय मंत्र Mahamrityunjaya Mantra जप करण्यात आला. कोरोनाच्या महामारीतून देशातील तसेच पृथ्वीतलावरील सर्वांचेच रक्षण व्हावे आणि ही मारीमारी लवकरात लवकर संपावी यासाठी या महामृत्यूंजय मंत्र जपाचे आयोजन करण्यात आले होते. 

समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा.काकासाहेब कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूरातील पुरोहित वर्गाने पुढाकार घेत या महामृत्यूंजय मंत्र जपाचे नियोजन केले होते. या उपक्रमासाठी वेद शास्त्र संपन्न जयंत फडके गुरुजी, वैभव कामतकर तसेच वेद प्रतिष्ठानचे अभिजीत तेरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणि उपस्थितीखाली समस्त पुरोहित सहभागी झाले होते. 

हे देखील पहा -

याशिवाय अमेरिकेतील ब्राह्मण मित्र मंडळ, कॅनडा येथील मराठी ब्राह्मण मित्र मंडळाने देखील या उपक्रमात आपला सहभाग नोंदवत भारतातील आणि जगातील कोरोना महामारी कमी होण्यासाठी सहभाग नोदवला. 

समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे, मुंबई तसेच कोल्हापूर यासह अमेरिका America , कॅनडा Canada ऑस्ट्रेलिया Australia येथील बहुसंख्येने ब्रम्हवृंद सहभागी झाले होते. याशिवाय सोलापूर येथे गोरगरीबांना तसेच बेघरांना मोठ्या प्रमाणात अन्नदानाचे वाटपही करण्यात आले.

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकाने, मंडई उद्यापासून सुरू होणार

या मंत्र जपात केदार अग्निहोत्री, दीपक कुलकर्णी, किरण कुलकर्णी, गोविंद अग्नीहोत्री, गिरीश जोशी, संतोष काकडे, अनिकेत तांबेकर, मुकुंद मुळेगावकर, प्रसाद देशमुख, नागनाथ कुलकर्णी, पांडुरंग तेरकर, राजु निंबर्गी, दत्तात्रेय कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्य पुरोहित सहभागी झाले होते.

Edited By - Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live