Ganesh Chaturthi 2022 : 'या' शुभ मुहूर्तावर करा, लाडक्या बाप्पांचे आगमन व पूजा विधी

गणपतीची प्राणप्रतिष्ठापना कशी कराल ?
Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022Saam Tv

Ganesh Chaturthi 2022 : मोरया रे बाप्पा मोरया रे..! उद्या ३१ ऑगस्टला घरोघरी गणपती विराजमान होतील. आपला लाडका बाप्पा मोठ्या जयघोषात व उत्साहात आपल्या घरी येईल. शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात १० दिवस गणपती बाप्पाची सेवा व मनोभावे पूजा केली जाईल. तसेच विविध प्रकारचे नैवेद्य देखील बाप्पाला दिले जाईल. जाणून घेऊया गणपतीच्या आगमनाचा व पूजेचा शुभ मुहूर्त

गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त -

Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi : गणपतीला कांदा व लसणाचा नैवेद्य का दाखवत नाही ? जाणून घ्या त्याचे कारण

यंदा गणपतीची (Ganpati) स्थापना ३१ ऑगस्टला होणार आहे. गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त ३१ ऑगस्टला सकाळी ११.०५ पासून ते दुपारी ०१.३८ पर्यंत राहील.

या मंत्राचा जप करा -

१. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

२. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।

नागाननाथ श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥

Ganesh Chaturthi 2022
Ganpati Sthapana 2022 : पहिल्यांदा तुमच्या घरी गणेशाचे आगमन होतेय ? अशी करा स्थापनेची पूर्वतयारी !

स्थापना विधी-

१. प्रथम कपाळाला गंध लावून आचमन करावे.देवापुढे विड्याचे पान त्यावर नाणे आणि सुपारी ठेवावी. देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा आसनावर बसा. हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे. अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात.

Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022 : यंदाच्या गणेश चतुर्थीला पूर्ण होतील प्रत्येक इच्छा, गणपतीला 'दहा' दिवस अर्पण करा या प्रिय वस्तू

२. उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले घेऊन मंत्रोच्चार करावा. श्रीगणेशाचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे. नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून श्रीगणेशाचे ध्यान करावे.

३. गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे. गणपतीच्या चरणांवर गंध, फुले,अक्षता यांनी युक्त पाणी (Water) वाहावे. ताम्हणात ४ वेळा पाणी सोडावे. गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत व्हावे, अक्षता वाहाव्यात.गंध लावावे, हळद, शेंदूर, फुले,हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात. प्रत्येक अवयवांवर अक्षता वाहाव्यात, विविध पत्री अर्पण कराव्यात. धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे. नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. विडा अर्पण करावा. विड्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वाहावे.आरती करावी, स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी. श्री गणेशास नमस्कार करावा, प्रार्थना करावी, एक पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com