धुळ्यात तब्बल 292 फळ, भाजी विक्रेत्यांची आरटीपीसीआर चाचणी

भूषण अहिरे
शुक्रवार, 21 मे 2021

साक्री तालुका वैद्यकीय पिंपळनेर येथील ग्रामपंचायतीच्या कक्षेतील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 292 किरकोळ व्यापारी आणि कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेतली आहे. अप्पर तहसीलदार विनायक थविल, अधिकारी यांच्या आदेशाने ही मोहीम राबविण्यात आली.

धुळे : साक्री Sakri तालुका वैद्यकीय पिंपळनेर Pimpalner येथील ग्रामपंचायतीच्या कक्षेतील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 292 किरकोळ व्यापारी आणि कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी RTPCR test करून घेतली आहे. अप्पर तहसीलदार Tehsildar विनायक थविल Vinayak Thavil, अधिकारी यांच्या आदेशाने ही मोहीम राबविण्यात आली. पिंपळनेर गावातील सर्व अत्यावश्यक सेवेतील व्यापारी व इतर किरकोळ व्यापारी यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याबाबत ग्रामपंचायतीतर्फे आवाहन करण्यात आले होते. RTPCR test of 292 fruit and vegetable sellers
  
अत्यावश्यक सेवेतील मेडिकलसह किराणा व्यापारी, भाजीपाला, फळ विक्रेते, इतर अत्यावश्यक सेवा, किरकोळ विक्रेते व दुकानातील कर्मचाऱ्यांसह सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले असल्याने सर्व आस्थापना मालकांनी कर्मचाऱ्यांसह चाचणी करुन घ्यावी अन्यथा अत्यावश्यक सेवा दुकाने सुरु ठेवता येणार नाही , असा इशारा ग्रामपंचायत Grampanchayat प्रशासनाने दिला होता . 

हे देखील पहा -

सध्या संपूर्ण राज्यामध्ये ब्रेक द चैन Break the Chain या मोहिमेअंतर्गत मेडिकल व  दवाखाने वगळता फक्त फळ विक्रेते तसेच भाजीपाला व किराणा दुकान यांनाच विक्रीची मुभा देण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हे किरकोळ विक्रेते कोरोना स्प्रेडर बनु नये या हेतूने आणि साक्री तालुक्यामध्ये कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला आळा घालण्यासाठी या किरकोळ विक्रेत्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची संकल्पना राबविण्यात आली आहे. RTPCR test of 292 fruit and vegetable sellers

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात धुळे पोलिसांचा कारवाईचा बडगा 

यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला मोठी मदत होणार असल्याचे देखील तहसील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live