कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, म्हणत मिसेस फडणवीसांचं पुन्हा ट्वीट, तर चाकणकर म्हणाल्या.. 

rupali and amruta
rupali and amruta

मुंबई: राजकीय शेरेबाजीमुळे नेहमी सोशल मीडियावर Social Media चर्चेत असलेल्या अमृता फडणवीस Amruta Fadanvis यांनी आणखी एक ट्विट Tweet केले आहे. यामध्ये त्यांनी आपण टीकाकारांची फारसे लक्ष देत नसल्याचे म्हटले आहे.

या ट्विट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनीही एक खोचक उत्तराने ट्विट करून अमृता फडणवीस यांना टोला मारला आहे. त्यामुळे आता  राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये BJP ट्विटवर वॉर रंगण्याची चिन्हे आहेत. Rupali chakankar reply to amruta fadnavis tweets to trollers

हे देखील पहा -

मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील Umesh Patil यांनीही अमृता फडणवीस च्या ट्विट वर  निशाणा साधला होता. राज्यावर तौक्ते चक्रीवादळाचे Tauktae Cyclone संकट ओढावले आहे आणि इकडे अमृता फडणवीस संवेदनशीलपणा दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करत होत्या. यामधून त्यांना सत्तेची किती लालसा आहे हे दिसून येते. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीने राज्यच्या संकटकाळात असे वागणे योग्य दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली होती.

आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री CM होऊन गेले आहेत त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करण्याचे सुचत आहे. अशा कठीण प्रसंगात सरकारवर संकट येईल अशी शेरोशायरी करण योग्य नाही, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वर्तन माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला  शोभणारे नाही असे  उमेश पाटील यांनी म्हटले होते. Rupali chakankar reply to amruta fadnavis tweets to trollers

‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असे ट्विट अमृता फडणवीसांनी सोमवारी तौक्ते चक्रीवादळादरम्यान केले होते. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com