पुलवामात सुरक्षा दलाकडून स्फोटकांचा साठा जप्त 

IED.jpg
IED.jpg

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या Jammu Kashmir पुलवामा Pulwama जिल्ह्यात सुरक्षा दलाने Security forces मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.  पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने स्फोटकांचा Improvised explosive device साठा जप्त केला आहे.  ज्यामुळे मोठा अपघात टळला  आहे. सुरक्षा दलाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर अवंतीपुरा पोलिस ठाण्यांतर्गत सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने पंजगममधील Panchgam  रेल्वे लिंक रोडजवळ ही कारवाई केली आहे. यानंतर बॉम्ब निष्क्रिय करणाऱ्या पथकाने कोणतेही नुकसान न करता आयईडी निष्क्रिय केला. (Security forces seize stockpile of explosives in Pulwama) 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला याबाबत माहिती मिळताच अवंतीपोरा पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने या भागाला घेराव घातला. यानंतर, स्फोटक सामग्री सुरक्षित ठिकाणी नेऊन निष्क्रिय  करण्यात आली. अवंतीपोरा पोलिस, सैन्याच्या 55 आरआर आणि 185 बीएन सीआरपीएफच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. यामुळे मोठी घटनाही टळली. यासंदर्भात कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार पोलिस स्टेशन अवंतीपोरा येथे एफआयआर क्रमांक 90/2021 नोंदविण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

कोविडकाळात पाकिस्तानकडून पुन्हा सीमा घुसखोरीचा प्रयत्न 
गेल्या वर्षीच्या साडेचार महिन्यांच्या तुलनेत भारत-पाकिस्तान सीमेवर यंदा घुसखोरीचे प्रयत्न  वाढल आहेत.  अतिरेकी  कारवाया करण्यासाठी तसेच बेकायदेशीर मादक पदार्थ आणि शस्त्रास्त्रांचा व्यापार वाढविण्यासाठी शेजारचा पाकिस्तान दहशतवाद्यांना आणि तस्करांना भारतीय क्षेत्रात घुसखोरीचे प्रयत्न करत आहे.  यानुसार, जम्मूमध्ये 10, राजस्थानातून 5 वेळा आणि काश्मीर व गुजरातमधून प्रत्येकी 1-1 वेळा घुसखोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com