राज्यात 'तौत्के'; डिजीपी चंडीगढला - शिवसेना नेता म्हणतो 'सॅक' करा!

वैदेही काणेकर
सोमवार, 17 मे 2021

महाराष्ट्रात वादळ लाट असताना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पांडे चंडीगढला कुणाचीही परवानगी न घेता दोन दिवसाठी गेले असल्याचे समजते आहे

मुंबई : महाराष्ट्रात वादळ लाट असताना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पांडे चंडीगढला कुणाचीही परवानगी न घेता दोन दिवसाठी गेले असल्याचे समजते आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांना फोन केल्यावर हे समजले आहे असे सांगत अशा या महासंचालकाला ताबडतोब सॅक केले पाहिजे, असे मत शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले आहे. Senior Shivsena Leader Expresses Displeasure over DGP Sanjay Pande

हे देखिल पहा

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोक्ते’चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे त्यामुळं कोकण किनारपट्टीला या चक्रीवादळाचा जबरदस्त फटका बसला आहे. राज्याच्या अन्य भागातही आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ आता कोकण किनारपट्टी भागातून पुढे गुजरातच्या दिशेने जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे, त्यामुळे या पट्ट्यात मोठा धोका निर्माण झाला आहे. समुद्र खवळलेला आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी राहणाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसतो आहे. 

अजित पवार यांनी घेतला तौत्केचा आढावा

विविध ठिकाणी घरे पडणे, झाडे पडणे अशाही घटना घडल्या आहेत. अशा वेळी पोलिस यंत्रणेची भूमीका महत्त्वाची आहे. मात्र, अशा वेळी  महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे मात्र गायब आहेत. संजय पांडे चंदीगडला असल्याचे गृहमंत्र्यांनी त्यांना फोन केल्यानंतरच समजले. त्याबाबत या नेत्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Senior Shivsena Leader Expresses Displeasure over DGP Sanjay Pande

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय पांडे यांनी  गेल्या वर्षभरात २० ते २५ वेळा पंचवीस वेळा चंदीगड दौरा परवानगीविना केला असल्याचे बोलले जात आहे. पांडे हे तेथे बंगला बांधत असल्याचेही सांगण्यात येते आहे. मुंबई पोलिस दलात गेल्या काही महिन्यांत मोठ्या घडामोडी घडल्या आहे. सचिन वाझे प्रकरण, परमबीरसिंग यांचा लेटरबाँब या घटनांमुळे पोलिस दल ढवळून निघाले आहे, अशातच ही नवी बाब समोर आली आहे. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live