इंद्रायणी नदीच्या घाटावर सत्तर मित्रांनी राबविले स्वच्छता अभियान

दिलीप कांबळे 
मंगळवार, 1 जून 2021

योगेश जाधव यांनी आपल्या सत्तर मित्रांच्या साहाय्याने 'आम्ही देहूकर' यांच्या वतीने अस्वच्छ इंद्रायणी नदीवरील घाट स्वच्छ करण्याचा संकल्प हाती घेतला. 

मावळ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज Sant Tukaram Maharaj यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहूगावातील Dehu इंद्रायणी नदीच्या Indrayani river घाटावर स्वच्छता अभियान Sanitation campaign राबविले. देहूगावातील इंद्रायणी नदीच्या घाटावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली देहूगावातील इंद्रायणी नदीच्या घाटावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याचे योगेश जाधव यांच्या निदर्शनास आले.  (Seventy friends carried out a clean up operation on the banks of Indrayani river in Dehu) 

​त्यानंतर योगेश जाधव आणि त्यांच्या सत्तर मित्रांच्या साहाय्याने 'आम्ही देहूकर' यांच्या वतीने अस्वच्छ इंद्रायणी नदीवरील घाट स्वच्छ करण्याचा संकल्प हाती घेतला. तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत देहूतील स्मशानभूमी आणि पवित्र इंद्रायणी नदी काठचा घाट बांधण्यात आला होता. घाटावरील आकर्षक मेघडंबरी वृक्षारोपण सुरू असलेल्या बोटिंग मुळे हा परिसर सुंदर पर्यटन स्थळ बनला आहे.

महाराष्ट्राला दिलासा! 24 तासात राज्यात 15,077 नवीन रुग्ण

मात्र भाविक भक्तांकांकडून पात्रात टाकण्यात येणाऱ्या निर्माल्यमुळे आणि स्मशानभूमीतील राख यासर्व घटकांमुळे घाट आणि परिसर अस्वच्छ झाला होता. त्यामुळे नदीतील जलचर प्राणी तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. मागील दशकात अश्याच कारणामुळे अनेक मासे यात मृत्युमुखी पडले होते. 

यापुढे ही स्वच्छता आठवड्यातून एकदा होणार आहे. गावातील प्रत्येक घरातील एक सदस्य ह्या नदीवरील घाट स्वच्छ Clean करण्यासाठी मदत करणार असल्याचे योगेश जाधव यांनी सांगितले आहे. दरम्यान,  संत तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा एक जुलैला होणार आहे. त्यानिमित्ताने अनेक वारकरी ग्रामस्थ आमच्या गावात येणार आहेत.  त्यांना आंघोळीसाठी आणि इंद्रायणी नदीचे दर्शन घेण्यास यायचे असते. त्यामुळे नदीवरील घाट स्वच्छ असला पाहिजे हीच एक अपेक्षा योगेश जाधव यांनी व्यक्त केली आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live