पृथ्वी शाॅ ला पोलिसांनी काढायला लावला ई-पास

अनंत पाताडे
शुक्रवार, 14 मे 2021

बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पृथ्वीची गाडी आंबोली पोलीस दुरक्षेत्राजवळ आली असता आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी ई पास तपासणीसाठी मागितला असता त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याचे सांगितले

सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक लॉकडाउन असताना देखील भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ विनापास मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याला जात होता. मात्र आंबोली पोलिसांनी ई पास ची विचारणा केली असता पृथ्वी शॉ जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याने पृथ्वीचा गोंधळ उडाला. Sindhudurg Police Stopped Cricketer Prithvi Shaw for E-pass

ई पास असल्याशिवाय  पुढे जाता येणार नाही असं पोलिसांनी सांगितले. त्यानंतर ऑनलाईन पास काढून पृथ्वी गोव्याकडे मार्गस्थ झाला. मुंबईहून प्रवास करताना पृथ्वीला कुठेही पास विचारण्यात आला नाही. मात्र, आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे क्रिकेटरला एक तास आंबोलीत थांबून राहावे लागले.

बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पृथ्वीची गाडी आंबोली पोलीस दुरक्षेत्राजवळ आली असता आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी ई पास तपासणीसाठी मागितला असता त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याचे सांगितले.Sindhudurg Police Stopped Cricketer Prithvi Shaw for E-pass

जपानमध्ये आॅलिंपिक पुढे ढकलण्याची मागणी

त्यामुळे आंबोली पोलिसांनी पास शिवाय जाता येणार नाही, असे सांगत त्याला तिथेच थांबवले. पृथ्वी शॉ ने आंबोलीतूनच ऑनलाईन पध्दतीने ई पाससाठी अर्ज केला. त्यानंतर एक तासाने त्याचा पास तयार होऊन मोबाईलवर आल्यावर तो पास आंबोली पोलिसांना दाखवून गोव्याकडे मार्गस्थ झाला.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live