World Cup 2023: वर्ल्डकप स्पर्धेआधीच क्रिकेटप्रेमींना BCCI ने दिली मोठी भेट, ४ लाख तिकीटं विकणार, कशी घ्याल?

World Cup 2023: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ८ सप्टेंबरपासून तिकीटांची विक्री सुरू करत आहे. जास्तीत जास्त उत्साही क्रिकेट चाहत्यांना सामावून घेण्यासाठी बीसीसीआय मोठ्या संख्येने तिकीटांची विक्री करणार आहे.
World Cup 2023 ticket
World Cup 2023 ticketSaam Tv

World Cup 2023 ticket:

क्रिकेट विश्व चषक जसजसा जवळ येत असून त्याची उत्कंठा वाढू लागलीय. जगभरात क्रिकेटला मोठी पसंती दिली जाते. अनेकांसाठी क्रिकेट जीव की प्राण असते, अशा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ८ सप्टेंबरपासून तिकीटांची विक्री सुरू करत आहे. जास्तीत जास्त उत्साही क्रिकेट चाहत्यांना सामावून घेण्यासाठी बीसीसीआय मोठ्या संख्येने तिकीटांची विक्री करणार आहे. (Latest News On World Cup)

बीसीसीआयनं जाहीर केल्यानुसार, यावेळी तब्बल चार लाख तिकीटांची विक्री केली जाणार आहे. ज्या राज्यात हे क्रिकेट सामने खेळवले जाणार आहेत, तेथील असोशिएशनशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने बहुप्रतीक्षित स्पर्धेसाठी अधिक तिकिटे जाहीर केली. जास्तीत जास्त उत्साही क्रिकेट चाहत्यांना सामावून घेण्याचा आणि या ऐतिहासिक स्पर्धेत त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.

World Cup 2023 ticket
Babar Azam Record: बाबरचा 'विराट' कारनामा मोठ्या विक्रमात सचिनलाही मागे सोडत रचला इतिहास

यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींना क्रिकेट उत्सव पाहण्यासाठी आपली सीट सुरक्षित करता येणार आहे. या स्पर्धेची जगभरातील प्रचंड आवड लक्षात घेता तिकिटांना मोठी मागणी असण्याची शक्यता असल्याने तिकिटे सुरक्षित ठेवण्यासाठी चाहत्यांनी तत्परतेने पावले उचलावीत, असे आवाहनही बीसीसीआय करण्यात आलंय.

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 च्या सर्व सामन्यांच्या तिकिटांची सामान्य विक्री ८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजेपासून सुरू होईल. क्रिकेट चाहते अधिकृत वेबसाईट https://tickets.cricketworldcup.com. वर जाऊन आपले तिकीट खरेदी करू शकतात. दरम्यान तिकीट विक्रीची पुढील माहिती योग्य वेळी दिली जाईल. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 च्या तिकीट कमी असल्याची तक्रार किक्रेट चाहते सोशल मीडियावर करत होते. त्यानंतर बीसीसीआयनं ही घोषणा केली, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी गगन ठेंगणं झालंय.

World Cup 2023 ticket
IPL Players Opportunity In Team India: IPL गाजवलेले हे ३ खेळाडू आता क्रिकेट विश्व गाजवणा! लवकरच मिळू शकते टीम इंडियात संधी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com