CSK vs RCB Score: चेन्नईकडून चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, कॉनवे-दुबेची तुफान फटकेबाजी; तरीही धोनीचं टेन्शन कायम

IPL 2023 RCB Vs CSK: चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर बंगळुरूपुढे विजयासाठी २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात २२७ धावांचे बलाढ्य आव्हान दिले आहे.
RCB Vs CSK Live Updates:
RCB Vs CSK Live Updates: Twitter/@CSK

RCB Vs CSK Live Updates: सलामीवीर डेवॉन कॉनवेच्या ४५ चेंडूत ८३ धावा. त्याला शिवम दुबेनी दिलेली ५२ धावांची साथ आणि शेवटच्या काही षटकात अंबाती रायडू आणि मोईन अलीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर विजयासाठी २२७ धावांचे बलाढ्य आव्हान ठेवलं आहे.

RCB Vs CSK Live Updates:
Sachin Tendulkar: अर्जुनचा पहिला सामना सचिनने ड्रेसिंग रूममधून का पाहिला? सचिनने सांगितलेलं कारण ऐकून अभिमान वाटेल

बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नई संघाची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. वेगवान गोलंदाज मोहमद सिराजने डावाच्या तिसऱ्याच षटकात ऋतुराज गायकवाडला माघारी पाठवलं. गायकवाड केवळ ३ धावा काढून बाद झाला. (Latest sports updates)

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अजिंक्य रहाणेने कॉनवेच्या साथीने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेट्साठी ७४ धावांची भागीदारी केली. अजिक्य रहाणे ३७ धावा काढून बाद झाला. आपल्या सुंदर खेळीत त्याने ३ षटकार आणि २ चौकार लगावले.

रहाणे बाद झाल्यानंतर शिवम दुबे मैदानावर आला. त्याने कॉनवेच्या साथीने चेन्नईचा डाव पुढे नेला. सुरूवातीला सावध फलंदाजी केल्यानंतर ऐनवेळी दुबेने रौद्ररुप धारण केलं. त्याला कॉनवेची सुद्धा चांगली साथ मिळाली. दोघांनी तिसऱ्या विकेट्साठी १०८ धावा जोडल्या. वेन पार्नेलने दुबेला बाद करत ही जोडी फोडली.

दुबेने २७ चेंडूत ५२ धावा चोपल्या. यात त्याने ५ षटकार आणि २ चौकार ठोकले. दुसरीकडे कॉनवे शतकाकडे वाटचाल करत असताना हर्षल पटेलने त्याला क्लीन बोल्ड केलं. कॉनवेने ४५ चेंडूत ८३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने ६ चौकार आणि ६ षटकारांची आतिषबाजी केली. शेवटच्या काही षटकात शेवटच्या काही षटकात अंबाती रायडू आणि मोईन अलीने आक्रमक खेळी करत चेन्नईला २०० चा टप्पा पार करून दिला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com