IND vs AUS : कसोटीत कमावलं पण वनडेत गमावलं, टीम इंडियाच्या पराभवाची ५ मोठी कारणे

India vs Australia ODI Series : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २-१ अशा फरकाने खिशात घातल्यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सुरूवात केली होती.
India vs Australia ODI Series
India vs Australia ODI Series Saam TV

India vs Australia ODI Series : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २-१ अशा फरकाने खिशात घातल्यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सुरूवात केली होती. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिकेतही पराभव करेल, अशी आशा क्रिडाप्रेमींना होती. मात्र, घडलं भलतंच. अखेरच्या दोन वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन केलं आणि भारताला पराभवाची धूळ चारली.  (Latest Sports News)

India vs Australia ODI Series
Video: कुलदीप यादवची जादूई फिरकी, नेमकं काय झालं ते बॅट्समनला कळलंच नाही; व्हिडिओ पाहाच

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या सलग दोन पराभवानंतर टीम इंडियाने मायदेशातील वनडे मालिका गमावली. १-२ अशा फरकाने गमावली. बुधवारी महेंद्रसिंग धोनीचे होमग्राऊंड असलेल्या चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा २१ धावांनी पराभव केला.

ऑस्ट्रेलियाने (Australiaप्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी ५० षटकात २७० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पूर्ण करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. परंतु १० व्या षटकात भारताची धाव संख्या ६५ असताना कर्णधार रोहित शर्मा झेल बाद झाला.

त्याच्यानंतर लगेचच १३ व्या षटकात युवा क्रिकेटर शुभमन गिलची देखील विकेट पडली. त्यानंतर के एल राहुल आणि विराट कोहली या दोघांनी भारताचा (Team India) डाव सावरण्याचा प्रयन्त केला. विराटने ७२ चेंडूत ५४ धावा केल्या. तर के एल राहुल ३२ धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हार्दिक पांड्याने ४१ धावा करून भारताला लक्ष्याच्या जवळ पोहोचवण्यासाठी मदत केली.

मात्र, हार्दिक चांगली फलंदाजी करत असताना अखेर स्टीव स्मिथ याने त्याचा झेल पकडला आणि तो बाद झाला. त्यानंतर लगेचच रवींद्र जडेजाही बाद झाला. शेवटच्या काही षटकात मोहम्मद शमीने फटकेबाजी केली. परंतु अखेर ऑस्ट्रेलियाला भारताच्या  (India vs Australia)  १० विकेट घेण्यात यश आले आणि ऑस्ट्रेलीयाचा २१ धावांनी विजय झाला. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपट्टू अॅडम झंपाने ४ तर एगरने २ बळी घेतले.

टीम इंडियाच्या वनडेतील पराभवाची ५ मोठी कारणे

  • केएल राहुलने पहिल्या वनडे सामन्यात जबरदस्त खेळी करून टीम इंडियाला विजय मिळून दिला होता. इतर दोन सामन्यात एकाही फलंदाजाला तशी कामगिरी करता आली नाही.

  • सलग तीन वनडे सामन्यात भारताची सलामीची जोडी अपयशी ठरली. रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन यांच्यापैकी एकाही फलंदाजाने मोठी खेळी केली नाही.

  • तिन्ही वनडे सामन्यात भारताची मधली फळी अपयशी ठरली. सूर्यकुमार यादव सलग तीन वनडे सामन्यात शून्य धावावर बाद झाला. त्यामुळे मधल्या फळीवर दडपण आले.

  • कर्णधार म्हणून रोहित शर्माने घेतलेले काही निर्णय चुकले. योग्यवेळी निर्णय घेण्यास रोहित शर्मा चुकला. याचा फायदा ऑस्ट्रेलियन टीमने घेतला.

  • भारतीय गोलंदाजांना तिन्ही वनडे सामन्यात गोलंदाजीत सातत्य राखता आलं नाही. शेवटच्या वनडे सामन्यात कुलदीपने ५ बळी टिपले. मात्र, त्याला इतर गोलंदाजांची साथ लाभली नाही.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com