SRH vs KKR Match Prediction: हैदराबादची बिर्याणी की कोलकाताचा रसगुल्ला; कोण कुणावर भारी?, पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match: आज आयपीएलमध्ये सनराईज हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमने-सामने येणार आहे.
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders MatchSaam TV

SRH vs KKR Head to Head: IPL 2023  इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १६ वा हंगाम निम्मा संपला आहे. टॉप ४ मध्ये फिनिश करण्यासाठी सर्वच संघांमध्ये चढाओढ सुरू आहे. आज आयपीएलमध्ये सनराईज हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. मागच्या सामन्यात हैदराबादने (SRH) दिल्ली कॅपिटल संघावर विजय मिळवला होता.

तर नितीश राणाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताला (KKR) गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, दोन्ही संघासाठी आजचा सामना अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. या सामन्यात नेमकं कुणाचं पारडं जड राहणार? दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय सांगतो? याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match
Virat Kohli-Gautam Gambhir : गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर १.०७ कोटींचा दंड विराट कोहली भरणार नाही, कारण...

हैदराबाद की कोलकाता कुणाचं पारडं जड?

आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद आणि कोलकाता हे दोन्ही संघ २४ वेळा आमने-सामने आले आहेत.यातील बऱ्याच सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा वरचष्मा राहिला आहे. कोलकाताने १५ सामने जिंकले आहेत. तर हैदराबादला केवळ ९ सामन्यात विजय मिळवता आला आहे. (Latest sports updates)

आतापर्यंत कोलकाताचा संघ जरी हैदराबादवर वरचढ ठरला असला, तरी यंदाच्या हंगामात हैदराबादचा संघ अधिकच मजबूत आहे. यावर्षी आयपीएलच्या १९ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा दारुण पराभव केला होता.

गुणतालिकेत दोन्ही संघाची अवस्था वाईट

आयपीएल २०२३ स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही. पॉईंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघांची अवस्था अतिशय बिकट आहे. कोलकाताने आतापर्यंत ९ पैकी फक्त ३ सामने जिंकले असून ते आठव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे हैदाबाद संघाची परिस्थिती कोलकातापेक्षा अधिकच वाईट आहे. हैदराबादने आतापर्यंत (IPL 2023) ८ सामने खेळले असून यातील ३ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. नेटरनरेट खराब असल्याने ते नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून कोणता संघ हा गुणतालिकेत भरारी घेणार हेच पाहणं महत्वाचं ठरेल.

KKR vs SRH अशी असू शकते प्लेईंग-११

सनराइजर्स हैदराबाद प्लेईंग-११: मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), हैरी ब्रूक, अब्दुल समद, मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार, अकील होसेन, उमरान मलिक

कोलकाता नाइट राइडर्स प्लेईंग-११: एन जगदीसन, रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेविड विसे, शार्दुल ठाकुर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com