
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सध्या फिफा वर्ल्डकप 2022 सुरू आहे. या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू मैदान गाजवत आहेत. वर्ल्डकपमध्ये बुधवारी (30 नोव्हेंबर) रात्री उशिरा ग्रुप-C मध्ये दोन मोठे सामने खेळले गेले. यामध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अर्जेंटिनाच्या संघाचा सामना रॉबर्ट लेवांडोस्कीच्या संघ पोलंड संघाशी झाला. अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यांत मेस्सीच्या संघाने 2-0 असा विजय मिळवला. (Latest Marathi News)
या विजयासह अर्जेंटिनाने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता सुपर-16 मध्ये अर्जेंटिनाचा सामना ड गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दुसरीकडे बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोच्या संघाने सौदी अरेबियाचा २-१ असा पराभव केला. (FIFA World Cup 2022)
हा सामना जिंकून मेक्सिकन संघाने पोलंड संघाच्या गुणांची बरोबरी केली. मात्र, गोल फरकामुळे त्यांना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवता आले नाही. अशाप्रकारे मेक्सिको आणि सौदी अरेबियाचा संघ क गटातून बाहेर फेकला गेला आहे. तर पोलंडचा संघ क गटात दुसऱ्या स्थानावर राहिल्याने तो सुपर-16 साठी पात्र ठरला. आता त्यांचा पुढचा सामना गतविजेत्या फ्रान्स संघाशी होईल.
मेस्सीने इतिहास रचला, मॅराडोनाला मागे टाकले
या सामन्यात सामन्यात मेस्सी आपल्या जुन्या रंगात दिसला नाही. या सामन्यात पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्यातही तो चुकला. एवढे सगळे होऊनही त्याने इतिहास रचला आहे. अर्जेंटिनासाठी विश्वचषकात 22 सामने खेळणारा तो खेळाडू बनला आहे. त्याने दिग्गज मॅराडोनाला मागे टाकले आहे.
अर्जेंटिनाकडून अँलिस्टर-अल्वारेझने केले गोल
पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिना आणि पोलंड संघाने सावध खेळ करत 0-0 अशी बरोबरी ठेवली होती. मात्र, दुसरा हाफ सुरू होताच अर्जेंटिनाच्या संघाने आपला खेळ आणखीनच आक्रमक केला. अर्जेंटिनाकडून अँलेक्सिस मॅक अँलिस्टरने 46 व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला.
यानंतर ज्युलियन अल्वारेझने अर्जेंटिनासाठी दुसरा गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. हा गोल ६७व्या मिनिटाला झाला. या सामन्यात पोलंडचा संघ पूर्णपणे बचावाच्या स्थितीत दिसला, अखेर त्यांना सामना 2 -0 अशा फरकाने गमावावा लागला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.