
LSG vs MI Eliminator: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील एलिमिनेटर सामना आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार असून सामन्यात कुणाचा विजय होणार याकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
अशातच लखनऊविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दोन्ही संघाची हेड-टू-हेड आकडेवारी पाहता आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघामध्ये तीन सामने झाले असून यात लखनऊचा संघ वरचढ ठरला आहे.
मुंबईला लखनऊविरुद्धचे तिन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र, असं असलं तरी मुंबईच्या संघाला लखनऊ हलक्यात घेणार नाही. कारण, मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या इतिहासात तब्बल १८ प्लेऑफचे सामने खेळले आहेत. (Latest sports updates)
यातील १२ सामन्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर ६ सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईने ५ वेळा आयपीएलचं चँम्पियनपद पटावलं आहे. त्यामुळे मुंबईचा प्लेऑफमधील रेकॉर्ड खूपच खास आहे.
महत्वाची बाब म्हणजे, जेव्हाही मुंबई इंडियन्सचा संघ (Cricket News) आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा त्यांनी पहिले किंवा दुसऱ्या क्रमांकावर फिनिश केलं. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिल्यानंतर त्यांना एकही फायनल खेळता आली नाही. यंदाच्या हंगामात मुंबईने चौथ्या क्रमांकावर राहून लीग स्टेजचा टप्पा पूर्ण केला आहे.
त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई आपला चांगला रेकॉर्ड कायम ठेवणार की लखनऊकडून पराभूत होणार याकडेचं क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मुंबई आणि लखनौ यांच्यात होणार्या एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ २६ मे रोजी, शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. आता गुजरात टायटन्स संघाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Indian Premier League 2023)
आयपीएलच्या इतिहासात एलिमिनेटरपर्यंत पोहोचलेल्या संघांचा विक्रम खूपच खराब राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या १५ मोसमात, एलिमिनेटर सामना खेळणाऱ्या संघाला एकदाच विजेतेपद पटकावता आलं आहे. सनरायझर्स हैदराबादने (Sport News) आयपीएल २०१६ मध्ये एलिमिनेटर सामना जिंकून त्यानंतर विजेतेपद मिळवलं होतं. हैदराबाद व्यतिरिक्त अशी कामगिरी कोणत्याही संघाला करता आलेली नाही.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.