Womens T20 WC 2023 : यापेक्षा दुर्दैवी काही असू शकत नाही; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत भावूक

विश्वचषकात टीम इंडियाची धुरा सांभाळणारी कर्णधार हरमनप्रीत कौरने माध्यमांशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिली.
Womens T20 World Cup 2023 IND vs AUS
Womens T20 World Cup 2023 IND vs AUSSaam TV

Womens T20 World Cup 2023 : आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. केपटाऊनमध्ये झालेल्या या रोमांचक सामन्यात कांगारू महिला संघानं टीम इंडियाचा ५ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाचा टी-२० विश्वचषकातील प्रवास संपला. दरम्यान, सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया खूपच निराश दिसून आली. (Latest Sports News)

Womens T20 World Cup 2023 IND vs AUS
IND vs AUS Semi Final : भारताच्या हातातून सामना कसा निसटला; ही आहेत पराभवाची ५ मोठी कारणे

विश्वचषकात टीम इंडियाची धुरा सांभाळणारी कर्णधार हरमनप्रीत कौरने माध्यमांशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिली. तसेच, सामन्यात संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचंही हरमनप्रीतनं कौतुक केलं. सामना आमच्या हातात होता. अशा परिस्थितीत आम्ही पराभवाची अपेक्षा केली नव्हती, असंही हरमनप्रीत म्हणाली.  (cricket news)

'आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले'

टीम इंडियाच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौर खूपच निराश दिसली. 'यापेक्षा दुर्दैवी वाटू शकत नाही. जेमिमाच्या खेळीमुळे आम्हाला गती मिळाली होती. त्या स्टेजला येऊन सामना हरण्याची आम्हाला अपेक्षाच नव्हती. मी ज्याप्रकारे धावबाद झाले, यापेक्षा दुर्दैवी काही असू शकत नाही. आमच्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं होतं आणि आम्ही सामन्यातील शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले, असं हरमनप्रीत म्हणाली.

'आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं होतं. आम्हाला लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हा ते आमच्यासाठी चांगलं होतं. आम्ही सुरुवातीला 2 विकेट झटपट गमावल्या पण आम्हाला माहीत होतं की, आमची फलंदाजी मजबूत आहे. आम्ही जेमिमाला श्रेय देतो, ज्यामुळे आम्हाला मोमेंटम मिळाला. काही चांगली कामगिरी पाहून आनंद झाला. आम्ही चांगली खेळी केली. आज क्षेत्ररक्षणात उणीवा होत्या. आम्ही काही सोप्या कॅचेस सोडल्या', अशी खंतही तिने व्यक्त केली. (India vs Australia)

Womens T20 World Cup 2023 IND vs AUS
Team India Vice Captain : रोहित शर्माचा मित्र होणार टीम इंडियाचा उपकर्णधार; केएल राहुलनंतर कुणाला मिळणार संधी?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात काय घडलं?

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला (Team India) १७४ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. शफाली वर्मा (९), उपकर्णधार स्मृती मनधाना (२) आणि यास्तिका भाटिया (४) झटपट माघारी परतल्याने भारताची ३ बाद २८ अशी स्थिती झाली होती.

यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या जेमिमा आणि हरमनप्रीत यांनी चौथ्या गडय़ासाठी ६९ धावांची भागीदारी रचत भारताच्या आशा कायम ठेवल्या. दोघींनी मिळून तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घाम फोडला. आता ही जोडी भारताला विजय मिळवून देईल, असं वाटत असतानाच मोठा फटका मारण्याच्या नादात जेमिमा बाद झाली. (cricket news)

जेमिमाने आपल्या खेळीत ६ चौकार मारले. यानंतर हरमनप्रीतने रिचा घोषच्या (१४) साथीने भारताच्या धावसंख्येत भर घालणे सुरू ठेवले. दरम्यान, अर्धशतक झळकावल्यानंतर दुसरी धाव घेताना बॅट खेळपट्टीमध्ये अडकल्याने हरमनप्रीत धावबाद झाली. तेथूनच सामन्याचे चित्र पालटले. त्यानंतर भारताच्या एकामागोमाग एक विकेट पडत गेल्या आणि भारतीय संघ २० षटकांत केवळ १५७ धावाच करू शकला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com